Home वरोरा संतापजनक :- जोर जबरदस्तीने जमीन हडपनाऱ्या सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांने घेतले विष.

संतापजनक :- जोर जबरदस्तीने जमीन हडपनाऱ्या सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांने घेतले विष.

जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू, सावकारासह इतरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी.

शेतजमीन सावकारांच्या घशात, प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी सावकारांच्या बाजूने ?

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यात सावकारांनी शेकडो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अल्पसे कर्ज देऊन स्वतःच्या नावाने विक्री केल्याच्या व त्या शेतजमिनी स्वतःच्या नावाने करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या तक्रारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी व जिल्हादंडाधिकारी यांच्यासह जिल्हा उपनिबंधक व न्यायालयात दाखल आहे. पण येथील भ्रष्ट अधिकारी सावकारांकडून लाच घेऊन शेतकऱ्यांविरोधात निर्णय देत असल्याने शेतकरी आत्महत्या करण्याच्या निर्णयापर्यंत पोहचला असल्याची विदारक परिस्थिती असतांना आता तालुक्यात वंधली या गावातील मारोती चौधरी या शेतकऱ्याने सुराणा नावाच्या सावकाराने शेतजमीन हडपल्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले असल्याची माहिती आहे.

मारोती चौधरी यांना कर्ज देण्याच्या मोबदल्यात सावकाराने स्वत:च्या नावाने विक्री करून घेत काही रक्कम दिली. त्यानंतर व्याजाचे पैसे परत करण्यासाठी ते सावकाराकडे गेले असता त्यांनी पैसे घेण्यास नकार देऊन तुझी शेतजमीन माझ्या मालकीची झाली असल्याचे सांगून काही स्थानिक लोकांना पकडून त्या शेतजमीनीवर कब्जा करण्यासाठी सावकार गेले असता आपलं आता सर्वस्व लुटल्या जातं असल्याने अतिव्यथित झालेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला दरम्यान ही बाब त्यांच्या मुलाना माहीत होताच त्यांनी गंभीर अवस्थेत त्यांना अगोदर उपजिल्हा रुग्णालय वरोरा व त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मारोती चौधरी यांच्या नावाने वरोरा तालुक्यातील वंधली या गावात ५.१६ हेक्टर आर शेती आहे. माढेळी येथील सावकार अनिता राजेंद्र सुराणा यांनी कर्जरुपात ६ लाख रुपये देण्याच्या नावाखाली मारोती चौधरी यांच्याकडून शेतीची स्वत:च्या नावाने विक्री करून घेतली. मोजणी, फेरफार आणि व्याज पकडून दीड लाख रुपये कपात केले आणि उर्वरित साडे चार लाख रोख स्वरुपात दिले. हा व्यवहार भोयर नामक दलालाच्या माध्यमातून झाला. ही जमीन सोडविण्यासाठी टप्प्याटप्याने सुराणा ७ लाख ७० हजार रुपये दिले. परंतु, अनिता आणि त्यांचे पती राजेंद्र सुराणा जमीन परत करण्यास टाळाटाळ करीत होते व पुन्हा १२ लाखांची मागणी करीत होते, दरम्यान या शेतजमिनीवर कब्जा करण्यासाठी सावकार चौधरी कुटुंबीयांना धमकी देण्याचे प्रकार करत होते. सध्या जमीन चौधरी यांच्याच ताब्यात असून वहिवाट सुरू आहे. परंतु, सुराणा यांच्याकडून शेतीची मोजणी करून ताबा मिळविण्याचे षडयंत्र सुरू आहे. ७ जून रोजी सुराणा यांनी या जागेची मोजणी केली. याचा मानसिक धक्का बसल्याने मारोती चौधरी यांनी शेतातच विष प्राशन केले. त्यांची प्रकृती गंभीर असून, रुग्णालयात उपचार सुरू आहे. सावकार सुराणा आणि दलाल यांच्या बळजबरीने शेतजमीन हडपली जातं असल्याने वडिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत दिशाभूल करून केलेली जमिनीची विक्री रद्द करण्यासाठी न्यायालयात प्रकरण दाखल केल्याची माहिती सतीश आणि मनोहर चौधरी या भावंडांनी यांनी दिली.

Previous articleतुम्ही स्वतःसाठी प्लॉट घेत आहात तर सावधान कृषक जमिनीवर अनधिकृत प्लॉट
Next articleवादळी वाऱ्यामुळे नागरिकांच्या झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here