Home Breaking News महाराष्ट्रात यलो अलर्ट; पुढील दोन दिवस ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पाऊस

महाराष्ट्रात यलो अलर्ट; पुढील दोन दिवस ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पाऊस

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

महाराष्ट्र :-  मान्सूनने ७ जूनला केरळमध्ये हजेरी लावली. आहे. नैऋत्य मौसमी वाऱ्यांनी हळूहळू केरळ, कर्नाटकाचा काही भाग व्यापला असून, मान्सूनची महराष्ट्राकडे वाटचाल चालू आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसात राज्यात मान्सून हजेरी लावेल, अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. दरम्यान पुढचे दोन दिवस हवामान . विभागाकडून महाराष्ट्राला यलो अलर्ट (Rai forecast) देण्यात आला आहे. ११ जून आणि १२ जून रोजी महाराष्ट्रातील काही भागात वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे, असे हवामान विभागाकडून दिलेल्या बुलेटीनमध्ये स्पष्ट केले आहे.

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संपूर्ण गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छ या भागाला बिपरजॉयचा तडाखा बसणार असणार असल्याने या भागात १५ जूनपर्यंत तर, गोवा, महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला पुढचे ११ जून आणि १२ जून या दोन दिवस वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली आहे. तर संपूर्ण विदर्भात १५ जूनपर्यंत विजांच्या कडकडाटांसह मान्सूनपूर्व वादळी पावसाची अधिक शक्यता आहे, असे देखील हवामान विभागाकडून स्पष्ट (Rai forecast) करण्यात आले आहे.

यलो अलर्ट म्हणजे काय?

पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते, अशी सुचना हवामान विभागाकडून जारी करण्यात येते. दरम्यान हवामान विभागाकडून पावसासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे, यामुळे दैनंदिन कामे रखडू शकतात. दरम्यानच्या काळात सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here