जनआक्रोश संघटनेचे अध्यक्ष अँड अमोल बावणे यांची अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी.
वरोरा प्रतिनिधी(मनोहर खिरटकर )
वरोरा तालुक्यातील खांबाडा या गावात सतीश तोडासे या महावितरणच्या कंत्राटी लाईनमनचा आज दिनांक 27 जून ला सायंकाळी 4 च्या दरम्यान भर पावसात इलेक्ट्रिक खांबावर चढल्याने शॉक लागून दुर्दैवी म्रुत्यू झाला, याला सर्वस्वी महावितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता भोयर, कनिष्ठ अभियंता पिजदुरकर व महावितरण चा मुख्य लाईनमन राजूरकर जबाबदार असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी जनआक्रोश संघटनेचे अध्यक्ष अँड अमोल बावणे यांनी केली आहे.दरम्यान म्रुतकाच्या परिवाराला किमान 15 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी सुद्धा महावितरण कंपनीकडे लावून धरली आहे.
MSEB (महावितरण) एम एस ई बी चे अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे सतीश तोडासे वय 22 वर्ष या तरुण युवकाचा मृत्यू हा युवक पत्तापूर येथील रहिवासी असून तो एम एस ई बी मध्ये मागील पाच ते सहा वर्षापासून काम करत होता आज दिनांक 27 6 2023 रोजी खांबाळा येथील विद्युत वाहिनीचे काम करत असताना सदर युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे, सदर ठिकाणी खांबावर विद्युत वाहिनीचे काम सुरू असतांना अनुभवी असलेले महावितरण चे कर्मचारी अधिकारी उपस्थित नव्हते त्यामुळं त्याला वेळेवर काहीही सुचले नसल्याने त्याचा शॉक लागून म्रुत्यु झाल्याचा खुलासा प्रत्यक्षदर्शी करत आहे.
सतीश तोडासे कंपनीचा कायमस्वरूपी कर्मचारी नव्हता तरीही त्याला बोलावून खांबावर चढण्यास सागितले आणि दुरुस्ती चे काम करायला लावले व काम करताना त्याचा मृत्यू या प्रकरणांमध्ये एम एस ई बी चे अधिकारी हे दोषी आहे त्यामुळं या प्रकरणातील महावितरण चे सबंधित अधिकारी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे.