Home वरोरा माना समाजातील समाजभूषण विभूती व गुणवंत विद्यार्थांचा सत्कार सोहळा संपन्न.

माना समाजातील समाजभूषण विभूती व गुणवंत विद्यार्थांचा सत्कार सोहळा संपन्न.

माना आदिम जमात मंडळ, मुबंईच्या शाखा वरोरा येथील पदाधिकाऱ्यांच्या अनोखा उपक्रम.

वरोरा प्रतिनिधी :

इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहिर झाला. यात सरस्वती विद्यालय, सालोरी येथील विद्यार्थीनी कु. स्वाती कबीर मगरे या विद्यार्थीनीने 79.20 गुण घेवून प्रथम क्रमांक मिळवीला तसेच त्याच गावातील कु. शितल मधुकर मगरे व नागेश मधुकर मगरे या दोन भाऊ बहिणीची टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्स मुबई येथे 30 विद्यार्थामधून संपूर्ण भारतातून त्यांनी मॅनेजमेन्ट प्रोग्राम क्षेत्रात निवड झाली. तसेच समाजभूषण पुरस्काराने सन्मानित श्रीमती संजीवनी तुळशीदासनामुळे मुख्याध्यापीका न.प. गांधी शाळा, वरोरा यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्यासाठी भरीव कामगीरीबाबत आणि कृ. जया श्रावण बगडे हीची स्पर्धा परिक्षेच्या व मुलाखतीच्या माध्यमातून वनपरिक्षेत्रपाल पदी नियुक्ती झाल्याबद्दल माना आदिम जमात मंडळ, मुंबई शाखा वरोऱ्याच्या वतीने वरील सर्वाचा शाल, त्रिफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

समस्त गावकरी बाधवांना आदिवासीच्या शासकीय सोई सवलती व शैक्षणिक बाबीवर मागदर्शन करण्यात आले. या वेळी माना आदिम जमात मंडळ, मुंबई शाखा सरोन्याचे अध्यक्ष रामशोक दडमल, उपाध्यक्ष यशवंतराव घोडमारे, सचिव विनोद खडसंग, कृषी अधिकारी श्री. भास्करराव गायकवाड जिल्हा प्रतिनीधी यादवराव घोडमारे, गुलाब श्रीरामे, सदस्य प्रभाकरराव वाघ दागेश श्रीरामे, दिनेश घोटे, महिला प्रतिनीधी सीमा घोडमारे, सोनुलाई दडमल, माजी पं.स. सदस्या सौ. पार्वताबाई ढोक सरपंच जीवनदास बावणे सत्कारमुर्तीचा गौरव व कौतुक सोहळ्यास समस्त गावकरी, विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरोष दडमल व आभार प्रदर्शन गुलाब श्रीराम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here