Home Breaking News नात्याला काडीमा फासणारी घटना सासऱ्याने केला सुनेवर बलात्कार

नात्याला काडीमा फासणारी घटना सासऱ्याने केला सुनेवर बलात्कार

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

माजरी  :-  भद्रावती तालुक्यातील माजरी पोलीस ठाणे अंतर्गत माजरी येथे एका ६० वर्षीय सासऱ्याने आपल्या २२ वर्षीय सूनेवर घरी कोणीच नसताना रात्री बारा ते एक च्या सुमारास नऊ जुलैला अत्याचार केल्याची घटना घडली सुनेने भीती आणि बदनामी च्या पोटी कुठेही घडलेल्या घटनेची वाच्यता केली नाही. मात्र सासऱ्याकडून पीडीतेला वारंवार धमक्याचा भडीमार होत असल्याने अखेर पीडित सूनेनी माजरी पोलीस ठाण्यात जाऊन शनिवार रोजी तक्रार दाखल केली या तक्रारीवरून आरोपी सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडीताचे लग्न 2019 मध्ये झाले घरामध्ये नवरा, दिर, आणि सासू, सासरा, असे लोक राहतात. मात्र घरातील नवरा व दीर रात्र पाळीतील ड्युटीला कामावर जात असल्याने आणि सासूची तबेत नेहमी खराब राहत असल्याने या संधीचा फायदा घेत सासऱ्याने ०९ जुलै रोजी रात्रौ बारा ते एक च्या सुमारास टीव्हीचा आवाज वाढवून सुनेला चाकूचा धाक दाखवत सुनेवर अत्याचार केला. मात्र थोडीफार हिम्मत दाखवून सुनेने माजरी पोलीस स्टेशन गाठले आणि १५ जुलैला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नात्याला कलंक लावणारी घटना असल्याने माजरी येथे या घटनेमुळे पूर्णतः खळबळ उडाली आहे. तक्रारी दरम्यान पीडीतेच्या तक्रारीवरून आरोपी सासऱ्या विरुद्ध कलम ३७६ /२,५०६, व भारतीय दंड (फ) अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी सासऱ्याला अटक करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाण्याचे ठाणेदार करीत आहेत.

Previous articleतब्बल ९ तास तलावात शोधकार्य अखेर नागभीड पोलिसांना चारही मुलांच्या मृतदेह मिळवण्यात यश
Next articleमुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी न चुकता रक्तदान करणाऱ्या वडीलाने केले मुलाच्या (प्रथम जयंतीला) रक्तदान वडील असावा तर असा?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here