Home Breaking News रायगड जिल्ह्यातील इरशाळगडमध्ये मोठी दुर्घटना १० जणांचा मृत्यू तर ढिगाऱ्याखाली अजून १५०...

रायगड जिल्ह्यातील इरशाळगडमध्ये मोठी दुर्घटना १० जणांचा मृत्यू तर ढिगाऱ्याखाली अजून १५० ते २०० लोक असल्याची शक्यता

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

रायगड  :-  जिल्ह्यातील खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली आहे. येथे दगड घसरल्याने 25-30 घरे दगड- मातीखाली गाडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 96 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 21 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.. ढिगाऱ्याखाली अजून 150 लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी असून अंधार आणि पाऊसही असल्याने बचावकार्यात प्रचंड अडथळे येत असल्याने बचावकार्य काही वेळासाठी थांबवण्यात आलं आहे. काल बुधवारी रात्री 12 वाजता ही मोठी दुर्घटना घडली आहे. अशा स्थितीत दगड आणि माती घसरल्याने संपूर्ण गावातील घरे कचाट्यात सापडले आहे, त्या घरामध्ये अनेक लोक असण्याची भीती केली जात आहे, अशा परिस्थितीत मोठा दगड घसरण्याचे कारण असे मानले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही खालापूर येथील घटनास्थळी पोहोचून बचावकार्याचा आढावा घेतला. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना लवकरात लवकर कसे बाहेर काढता येईल, याबाबत घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु आहे. इरसालवाडी हे गाव दुर्गम भागात डोंगराच्या माथ्यावर वसलेले आहे. तिथे पोहोचण्यासाठी मार्ग नाही. साधारण 1 किलोमीटर पायी चालावे लागते. एनडीआरएफ, नवी मुंबई अग्निशमन दल आणि पोलीस पायीच घटनास्थळी पोहोचले आहेत. रात्रीच्या वेळी चढाई करताना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाल्याचीही बातमी आहे. रात्रीच्या वेळी लोक आपापल्या घरात झोपले होते, तेव्हा अनेक घरे माती आणि दगडाखाली आले आहे

उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांनी इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत विधान परिषदेत निवेदन सादर केले. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली असल्याचे अजितदादांनी सांगितले. इर्शाळवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरू आहे. उंच डोंगर, पाऊस आणि चिखल साचल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत असून बचावकार्यासाठी एनडीआरएफ, सिडको, स्थानिक ट्रेकचे तरूण अशी 500 लोकांची टीम बचावकार्यात झटत असल्याची माहिती त्यांनी दिली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रायगड जिल्ह्यानी खालापूरजवळील घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here