Home वरोरा वरोरा येथील रूग्णालयाच्या जागेवरील अतिक्रमण तोडण्याची कारवाई तुर्तास थांबवा.

वरोरा येथील रूग्णालयाच्या जागेवरील अतिक्रमण तोडण्याची कारवाई तुर्तास थांबवा.

अतिक्रमण तोडण्यास प्रशासनाची घाई कां ? कुणाच्या दबावाखाली अतिक्रमण तोडले जातेय ? याचा खुलासा करा मनसेसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची मागणी.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा शहरात जिकडे तिकडे अतिक्रमण झाले असतांना व त्यामुळं शहराचं विद्रुपीकरण होतं असतांना प्रशासनाचे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतं आहे मात्र ज्यांच्या अतिक्रमणांने कुठलाही फरक पडत नाही अथवा जिथे सर्वसामान्य माणसाचा रोजगार आहे तिथे मात्र प्रशासन जाणीवपूर्वक अतिक्रमण तोडण्याची कारवाई करतात हे दुष्ट चक्र केंव्हा सुरू झाले ? यांची जाणीव आता येथील जनतेला व्हायला लागली असून प्रशासन हे कुणाची तरी कठपुतळी बनून काम करीत असल्याने सर्वसामान्य जनतेवर अन्याय होतं आहे. अशाच प्रकारचे उपजिल्हा रूग्णालयाच्या जागेवरील दुकानदारांचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई प्रशासन करीत असल्याने यावर तात्पुरती स्थिगिती द्यावी अशी मागणी मनसेसह इतर पक्षाच्या पदाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन काल दिनांक 20 जुलै ला केली होती, दरम्यान याबाबत उपविभागीय अधिकारी यांनी स्थानिक वैद्यकीय अधिकारी यांना भ्रमणध्वनी वरून बोलून अतिक्रमण धारकांना थोडा वेळ दया व त्याबाबत त्यांच्याकडून लिखीत घ्या असे सांगितले मात्र तरीही प्रशासन याबाबत ऐकायला तयार नसून अतिक्रमण तोडण्याची कारवाई होईलचं असा पवित्रा घेतल्याने एवढा मोठा दबाव कुणाचा आहे ? असा प्रश्न असा प्रश्न आता अतिक्रमण धारक विचारू लागले आहे.
वरोरा तहसिल येथील उपजिल्हा रूग्णालयासमोर ट्रामा केअर समोरील जागेवर मागील 10 वर्षापासून काही नागरीक रोजगार व स्वयंरोजगार करीत आहे. या जागेवर अतिक्रमण हटविण्याचे नोटीस जिल्हा शल्यचिकित्सक व स्थानिक वैद्यकीय अधिकारी वरोरा यांचे तर्फे स्थानिक दुकानदाराला देण्यात आले . दिनांक 21/07/2023 ला अतिक्रमण हटविण्याची ताकीदही देण्यात आली आहे. पण ऐन पावसाळ्यात दुकानदार वेळेवर कुठे जाईल हा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे.
सर्व अतिक्रमणधारक एक महिन्याचे आत अतिक्रमण हटविण्यास तयार असतांना ऐन पावसाळयात त्यांचे दुकान हटविण्याची कारवाई करण्याची प्रशासनाची घाई कशामुळे ? कां त्यांच्या भावना मेल्या कां ? की त्यांच्यावर कुठला तरी दबाव आहे ? हेच कळायला मार्ग नसून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून धनदांडग्यांना व राजकीय पुढाऱ्यांना वाचविण्याचा हा प्रकार लोकशाहीची गळचेपी करणारा असून याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसह जनजागृती व अभिनय आंदोलन करेल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी दिला आहे. यावेळी शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख योगिता लांडगे, मनसे जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, राष्ट्रवादीच्या रंजना पारशिवे, केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे डॉ. अंकुश आगलावे. प्रतीक मुडे, रोहित तुरानकर. व अतिक्रमणधारक उपस्थित होते. .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here