Home वरोरा धक्कादायक :- भाजप नेत्यांचे त्यांच्याच सरकार विरोधात मोर्चा आंदोलन ?

धक्कादायक :- भाजप नेत्यांचे त्यांच्याच सरकार विरोधात मोर्चा आंदोलन ?

जनतेचे काम करण्यासाठी भाजप मध्ये पक्ष प्रवेश करणाऱ्या त्या पांढरपेशा नेत्यांची लबाडी झाली उघड.

राजकीय कट्टा :-

राजकारण कधी कुठे कसं करावं यांचं भान नसलेले काही कालबाह्य नेते कसे तोंडघशी पडतात याचं ज्वलंत उदाहरण वरोरा येथे नुकतेच घडलं. प्रश्न होता शेतकऱ्यांच्या सोयाबीन वर आलेल्या रोगामुळे झालेली नुकसान भरपाई सरकारने देण्याचा, खरं तर सरकारने पावसाळी अधिवेशनात स्पष्ट केलं होत की राज्यात झालेली अतिवृष्टी व पूर यामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे जे नुकसान झाले त्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे त्वरित करावे, पण हे सरकार एवढं लबाड आहे की अजित पवार यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ दिली पण विदर्भ आणि मराठवाड्यासह कोकणातील शेतकऱ्यांना अजूनपर्यंत नुकसान भरपाईच मिळाली नाही. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावती या दोन तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या सोयाबीन व कापूस या शेतपिकांचे नुकसान झाले असतांना सत्ताधारी असलेल्या भाजप च्या कुठल्याही नेत्यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिली नाही व याबाबत साधे निवेदन सुद्धा सरकार ला पाठवले नाही. आता ही स्थिती दोन महिन्यांपूर्वी झालेल्या नुकसानीची असतांना आता सत्ताधारी भाजप नेते हे वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकांवर आलेल्या रोगामुळे मोठे नुकसान झाल्याने नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढतात मग हे मोर्चे त्यांच्याच सरकार विरोधात नाही कां ?

भाजपा नेत्यांनी मोर्चा काढताना पक्षाचे झेंडे वापरले नाही तर तिरंगी झेंडे वापरले, म्हणजे मोर्चा काढला त्यांचे श्रेय पण यांना मिळणार आणि पक्षाचे झेंडे वापरले नाही तर पक्षाची बदनामी पण नाही होणार अशा प्रकारची रणनीती करून भाजप च्या नेत्यांनी मोर्चा काढला. याचा अर्थ सत्तेत राहून विरोधकांची दुय्यम भूमिका घेण्याचं कारस्थान यांनी केलं, मग हे भाजप नेते सत्तेत असण्याचा जनतेला काय फायदा ? केवळ आम्ही जनतेच्या पाठीशी आहो हे दाखवण्यासाठी जर हे मोर्च्याचे नाटकं असेल तर भाजप नेते हे जनतेला विशेष करून शेतकऱ्यांना मूर्ख बनवत आहे हे स्पष्ट होते. कुठल्याही सरकार विरोधात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा मोर्चा म्हणजे त्या नेत्यांचा त्यांच्या सरकारवरचा विश्वास उठला असा त्याचा अर्थ होतो आणि मग सरकारवरचा या नेत्यांचा विश्वासचं उडाला असेल तर या नेत्यांनी एक तर घरी बसावं नाहीतर शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी मैदानात उतरावं एवढाच पर्याय या नेत्यांकडे आहे. यांचं विशेष कारण म्हणजे हेच भाजप नेते जनतेचे काम करण्यासाठी भाजप मध्ये प्रवेश घेतल्याचे व जगात मोदींनी देशाची खूप प्रगती केल्याची आरोळी ठोकली होती, मग आता मोदींनी देशाची दुर्दशा केली असल्याचा साक्षात्कार झाल्याने यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी मोर्चा काढलाय कां ? हे भाजप नेत्यांनी स्पष्ट करावे.

भाजप सरकार म्हणजे सरळ सरळ व्यापाऱ्यांचे सरकार आहे, हे देशाचे ग्रुहमंत्री अमित शहा यांनी अगोदरच स्पष्ट केलं होतं. मोदींनी सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत म्हटलं होत॑ की माझं सरकार आल्याबरोबर मी सर्वात प्रथम शेतकऱ्यांची कर्जमाफी करेन यावर अमित शहा यांना मोदींच्या त्या आश्वासनांची आठवण पत्रकारांनी करून दिली होती की तुम्हच सरकार आलं तर तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार होते त्याच काय झालं. तर त्यांवर अमित शहा म्हणाले होते की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार हे कधी म्हटलंचं नव्हतं तर आम्ही देशातील उद्धोगपतींची कर्जमाफी करणार असे म्हटले होते आणि मोदी सरकारने जवळपास 35 लाख कोटी रुपयांचं पळून गेलेल्या व अदानी अंबानी या उद्धोगपतीवर असलेलं कर्ज माफ केलं ही वस्तुस्थिती आहे आणि मोदी सरकार म्हणजे व्यापाऱ्यांचे सरकार व शेतकरी विरोधी सरकार आहे हे दिसत आहे.

काल दिनांक 21 सप्टेंबर ला झालेला भाजप धार्जिणे नेत्यांचा मोर्चा म्हणजे केवळ बनवाबनवी होती कां? असाच प्रश्न निर्माण होतो कारण त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक सभासद यांना समोर करून भाजप च्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांत आपले नाव चर्चेत राहावे म्हणून हा खेळ केला कां ? असे अनेक प्रश्न निर्माण होत॑ आहे. त्यामुळं भाजप नेत्यांनी आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी सोयाबीन पेरणी करणार्यां शेतकऱ्यांची दिशाभूल चालवली आहे. जेंव्हा सरकारचं तुम्हच आहे तर तुम्हांला मोर्चा आंदोलन करण्याची काय आवश्यकता आहे. खरं तर तुम्हच्या एका पत्रानेच काम व्हायला पाहिजे पण त्यांच्यासाठी तुम्हाला आंदोलन करावे लागत असतील तर मग सत्ता असण्याचा फायदा तो काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here