Home Breaking News कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त 10% बोनस देण्यात यावा.म रा शि...

कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त 10% बोनस देण्यात यावा.म रा शि प

अतुल दिघाडे
जिल्हा प्रतिनिधी

 

राज्य  :-  राज्यातील 41 हजार कॉन्व्हेंट शाळेतील 10 लाख अल्प वेतनधारी शिक्षक कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 10% बोनस देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूल विभागातर्फे अध्यक्ष विवेक आंबेकर यांनी केली आहे. सरकारने शिक्षण संस्था चालकांना MEPS 1981 नियमानुसार सातवा वेतन आयोग लागू करण्यास बाद्य करावे व तेथील शिक्षक कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन व त्यांच्या सेवेतील सर्व सुविधा देण्यात येण्याबद्दल खडसावून सांगावे अन्यथा कमीत कमी त्यांची दिवाळी आनंदीत व सुख-समृद्धी ने जाण्याकरिता तेथील शिक्षक कर्मचाऱ्यांना 10 % बोनस देण्यास सांगावे.

देशात व राज्यात संविधानाचे राज्य आहे. कोणतीही शैक्षणिक संस्था ही आपल्या मर्जीनुसार शाळा, महाविद्यालय चालवू शकत नाही तर त्याला कायद्याचे अधिष्ठान असते.
त्याचप्रमाणे विनाअनुदानित शाळेला सुद्धा कायद्याच्या कक्षात चालविण्याकरिता शासनाने शिक्षण संस्थाचालकांना बाध्य करावे व येथील शिक्षक कर्मचाऱ्यांचे, जे अनेक वर्षापासून संस्थाचालक शिक्षक कर्मचाऱ्यांचे शोषण करीत आहे ते बंद करावे, अशी मागणी विनाअनुदानित कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक कर्मचारी करीत आहे.
टोलेजंग इमारतीत असणाऱ्या या शाळा दिसायला जरी भव्य व आकर्षित दिसत असले तरी हा त्यांचा डोलारा शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शोषणापासून तयार केलेला आहे.

अनेक कॉन्व्हेंट शाळेत शिक्षक कर्मचाऱ्यांना मजुरा पेक्षाही कमी वेतनात काम करावे लागते. 20 -20 वर्ष काम करूनही त्यांचे वेतन 10 हजार पेक्षाही वरती जात नाही. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना ग्रॅच्युईटी अथवा सेवा काळात त्यांचे पीएफ मध्ये पैसेही संस्थाचालक कापत नाही त्यामुळे त्यांना त्याचाही लाभ मिळत नाही.
सुशिक्षित शिक्षकांची अशी ही दयनीय स्थिती महाराष्ट्रात असून याकरिता शासन व शासकीय अधिकारी जबाबदार आहेत.
प्रत्येक जिल्हा जिल्ह्यात शिक्षण विभाग असून शिक्षणाधिकारी यांच्या देखरेखीखाली या शाळा चालविण्यात येतात. परंतु भ्रष्ट शिक्षण अधिकारी शिक्षण संस्थाचालकांच्या दावणीला बांधले असून तेथील शिक्षक कर्मचाऱ्यांना MEPS 1981 कायद्या ची सुविधा मिळवून देण्याकरिता कोणतेही पाऊल उचलत नाही.

त्याचप्रमाणे या शाळेत जे पाल्य शिकतात त्यांचे पालक अनेक मोठे अधिकारी व नेते असून तेही या बाबीकडे लक्ष देत नाही.
या कॉन्व्हेंट शाळेत 95 % महिला कर्मचारी कार्यरत असून उच्चशिक्षित महिला कर्मचाऱ्यांचेही शोषण किती सहजपणे करता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक कर्मचारी होत.

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री, माननीय शालेय शिक्षण मंत्री तथा सर्व लोकप्रतिनिधींना नम्र विनंती आहे की आपल्या पाल्यांना शिक्षण देणाऱ्या व त्यांचे आयुष्य उज्वल करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदित व सुख-समृद्धी ने जाण्याकरिता त्यांना पूर्ण वेतन देण्यात येत नसले तरी व 42 %महागाई भत्ता भेटत नसला तरी या दिवाळीनिमित्त 10% बोनस देऊन त्यांची दिवाळी आनंदित करावी अशी मागणी राज्यातील सर्व कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वतीने सरकारला करण्यात येत आहे.
विवेक आंबेकर
अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूल विभाग.
vivekambekar185@gmail.com

Previous articleरामनगर वॉर्डातील कचरा डेपोला तात्काळ हटवा…
Next articleघंटागाडीतील तब्बल 300 मनपा कंत्राटी कामगारांनी ऐन दिवाळीत कामबंद आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here