अंधाऱ्या रात्रीतून काळा पैसा कमाविण्याचा धंदा, पण कैमेरात सापडला बंदा? आयकर विभागातून चौकशी करावयाची मागणी.
चंद्रपूर :-
जिल्ह्यात सगळीकडे अवैध गौण खनिज व रेती चोरीच्या घटना वाढत असुन ज्या महसूल अधिकाऱ्यांच्या अधिनस्त तो विषय असतांना त्या चोरी वर प्रतिबंध लावण्याचे सोडून स्वतः त्या चोरांकडून पैसे कमविण्याचा गोरखधंदा चालवला असल्याची गंभीर बाब आता नित्याचीच बाब ठरत आहे. असाच एक चंद्रपूर महसूल अधिकारी अवैध गौण खनिज उत्खनन व रेती वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर मेहरबान होऊन अगदी थोड्या काळातच कोट्याधीश झाला असल्याची माहिती समोर येतं असुन त्यांच्या अवैध संमतीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान एका दिवसांपूर्वी पकडलेला हाप टन ट्रक पकडल्या नंतर तो पैसे घेऊन सोडल्याची माहिती पुराव्यासह समोर येतं असल्याने तो महसूल अधिकारी कोण याबाबत तर्कवितर्क लावल्या जात आहे.
चंद्रपूर मधील एक महसूल अधिकारी रोज नियमित अवैध गौण खनिज व रेती माफिया करणाऱ्या माफिया कडून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन लाखों रुपये कमावित असुन त्यांनी काही मर्जीतील लोकांना खुली सूट दिली आहे. त्यामुळे नव्याने कुणी या धंद्यात आला की त्याना टार्गेट करून त्यांच्याकडून हवे ते पैसे लुटण्याचा धंदा ते करीत असुन त्यांनी कोट्यावधी रुपयांची अवैध कमाई केली असल्याने त्यांच्यावर ईडी मार्फत कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.