Home वरोरा खळबळजनक :- एकोना वेकोली येथील कोळसा खाणीत बंधूकीच्या धाकावर कोळशासाठी चढाओढ ?

खळबळजनक :- एकोना वेकोली येथील कोळसा खाणीत बंधूकीच्या धाकावर कोळशासाठी चढाओढ ?

बाबु उर्फ नासीर खाँन, सरवर उर्फ नूर,  नासीर खॉन यांच्यावर वरोरा पोलीस स्टेशनं मध्ये गुन्हे दाखल.

वरोरा प्रतिनिधी :-

तालुक्यातील एकोना कोळसा खाणीत गुंड बदामश चोर लुचक्के यांना समोर करून कोळसा चोरीचा खेळ खेळल्या जात असून रोड सेल च्या कोळंशाच्या नावावर मोठे ढेले असलेला कोळसा, कोळसा खाणीतून बाहेर काढायचा व तो परस्पर ट्रक मध्ये भरायचा आणि तो खुल्या मार्केट मध्ये विकायचा असा खेळ एकोना कोळसा खाणीत होतं असून आज अशाच कोळसा भरण्याच्या स्पर्धेत आरोपी नी बंदूक ताणली असून हाणामारी झाली आहे यात बाबु उर्फ नासीर खाँन, सरवर उर्फ नूर, नासीर खॉन यांच्यावर वरोरा पोलीस स्टेशनं मध्ये गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती आहे

मिळालेल्या माहितीनुसार राहुल लाभानसिंग ठाकूर व त्याचे काका जगभानसिंह ठाकुर यांचे अनुक्रमे एक व सात ट्रक असून त्याद्वारे एकोना कोळसा खदानमध्ये रोडसेल चा कोळसा लिलावावरुन विकत घेवुन वणी येथे ट्रॉन्सपोर्टिग करायचे दरम्यान दिनांक 14/12/23 चे सायंकाळी 17/15 वा दरम्यान एकोना कोळसा खदान मध्ये बाबु उर्फ नारीस खॉन रा वणी यांचे ट्रक मध्ये नासीर खॉन याचा सुपरवायझर सरवर उर्फ नूर रा माजरी यांच्यासोबत हाणामारी झाली असून फिर्यादी ला बंदूक दाखवल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कोळसा भरण्यासाठी ट्रक क्रमांक AP 07 TF 9169 खदानित भरण्यासाठी आणला असता ऑपरेटर ने कोळसा भरणारे ट्रक बंद केले व आपरेटरला माझा ट्रकचा नंबर आहे मला ट्रक भरण्यास सांगितले असे म्हटल्यावर सरवर उर्फ नूर याने डोजर ऑपरेटर कडे जाऊन डोजर बंद करुन दिला. व फिर्यादी ला म्हणाला की फक्त ट्रकमध्ये कोळसा भरणार कोणी दुसरा भरणार नाही नंतर सरवर उर्फ नूर याने त्याचे ट्रकमालक बाबु उर्फ नासीर खाँन रा वणी जि. यवतमाळ याला फोन करुन बोलाविले तेंव्हा नासीर खाँन तिथे महिंद्रा धार फोरव्हिलर गाडी क्र MH 34 BV 8787 या गाडीने आला त्या गाडीमधुन नासीर खान व अब्दुल उर्फ ललऊ खाँन रा माजरी हे बाहेर आले त्यांचे कड़े काठी व चाकू होता त्यांनी फिर्यादी ला साले मादरचोद तेरे के देख लेता अशा अश्लिल शिवीगाळ करुन नासीर खान, सरवर उर्फ नुर व अब्दुल उर्फ ललऊ खॉन याने काठीने पाठीवर मारले व गालावर थापड मारले क बंद‌की सारखी वस्तु दाखवुन तु खदानचे बाहेर ये तुला मारुन टाकतो असे तिघांनी धमकी देवून ते निघून गेले त्यांचे पासुन फिर्यादी ला भीती झाल्याने त्यांचेवर कार्यवाही करावी अशी मागणी पोलीस स्टेशन वरोरा येथे दिलेल्या तक्रारीत केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here