Home वरोरा ब्रेकिंग :- वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात राजकीय भूकंप होणार ?

ब्रेकिंग :- वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात राजकीय भूकंप होणार ?

काँग्रेस चे भाजप मध्ये तर भाजप चे काँग्रसमध्ये जाणार ? चर्चेला उधाण.

वरोरा विशेष प्रतिनिधी :

राजकारण हे हवामानाच्या अंदाजानुसार बदलत असते ते योग्यचं आहे असं म्हणावं लागेल, कारणं जिथे सरडाही रंग बदलण्याच्या शर्यतीत फिका पडेल एवढे स्वतःच्या स्वार्थासाठी रंग बदलविणारे राजकीय नेते व लोकप्रतिनिधी दिसत आहे. राज्यात कधी काळी एकमेकांच्या विरोधात बंड पुकारणारे नेते एकमेकांच्या मांडीवर बसून थंड झालेले दिसतं आहे. मूल्य, नितीमत्ता, स्वाभिमान गहाण ठेऊन केवळ स्वहित साधण्यासाठी, ज्यांनी आपल्याला घडवलं, मोठं केलं त्याचा विसर पडणारे नेते खरं तर समाजाला कलंकच आहे, पण तेच कलंकित नेते राजकीय सत्तेत असेल तर त्यांच्यावर स्तुतुसुमने उधळणाऱ्या चाटूचमच्यांची काही कमी नाही आणि हतबल जनता मग तशा नेत्यांनाच पसंत करतात हे लोकशाहीचं खरं दुर्भाग्य आहे.

विषय आहे भद्रावती विधानसभा क्षेत्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीचा, या विधानसभा क्षेत्रात सर्वच संभावित उमेदवार हे येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत निवडून येण्याचे स्वप्नं पाहत आहे, भाजप कडे तर उमेदवारांची मोठी रांग लागलेली आहे की जणू त्यांनाच उमेदवारी जाहीर झालेली आहे, शिवाय आपल्याला कशी उमेदवारी मिळेल यांची रंजक उदाहरणे देऊन राजकीय ते गोळाबेरीज सांगत सुटले आहे, पण भाजप मध्ये काँग्रेस मधील एक स्पर्धक उडी मारण्याच्या तयारीत असुन भाजप च्या इच्छुक उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळवले जाण्याची शक्यता वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे. दरम्यान भाजपचे अस्त्र ठरलेल्या ईडीच्या रडारवर त्या काँग्रेसी उमेदवाराला भाजप उमेदवारी देणार का ? हा चिंतनाचा विषय असला तरी भाजप च्या अंतर्गत रणनीतीमुळे कधीकाळी शिवसेना स्ट्रॉंग असायची तिथे भाजप आपला डाव मारण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येतं आहे. या राजकीय घडामोडीत जर काँग्रेस मधून भाजप मध्ये त्या उमेदवारांनी एन्ट्री केली तर भाजप चे डझनभर नेतेमंडळी सुद्धा काँग्रेस मध्ये येणार असल्याची शक्यता सुद्धा निर्माण होतांना दिसतं आहे. या सर्व घडामोडी राजकीय भूकंप घडविणाऱ्या असुन याचा राजकीय फायदा कुणाला होईल व जणू आपल्याला उमेदवारी मिळाली असे समजून दिवसातंच आमदार होण्याचे स्वप्न पाहत आहे त्या हौशी व गुडघ्याला बाशिंग बांधून असणाऱ्या उमेदवरांचं नेमकं काय होईल? हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here