Home Breaking News मनपा क्षेत्रातील ऑटो रिक्षा परवाने मुख्य बसस्थानकापासून १० किमी परिघापर्यंत अनुज्ञेय

मनपा क्षेत्रातील ऑटो रिक्षा परवाने मुख्य बसस्थानकापासून १० किमी परिघापर्यंत अनुज्ञेय

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  महानगरपालिका क्षेत्रात देण्यात येत असलेले ऑटोरिक्षा परवाने हे चंद्रपूर शहरातील मुख्य बसस्थानकापासून १० किलोमीटर परिघापर्यंत असलेल्या ग्रामीण भागात अनुज्ञेय करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला पोलीस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे आदी उपस्थित होते.

बैठकीतील ठरावानुसार, महानगरपालिका जवळील बाजारपेठ, रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, शासकीय-निम शासकीय तसेच

खाजगी आस्थापना या ठिकाणी ये- जा करता येण्याच्या दृष्टीने परवाने हस्तांतरण व व्यवसाय करण्याची परवानगी अनुज्ञेय करण्यात आली आहे. याबाबत सर्व ऑटो चालक मालकांनी तसेच नागरिकांनी नोंद घ्यावी.

उजव्या बाजूचे दार लोखंडी सळीने बंद न केल्यास दंडात्मक कार्यवाही प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अपघात टाळण्यासाठी ऑटोरिक्षाच्या उजव्या बाजूचे दार लोखंडी सळीने बंद करण्यात यावे व प्रवाशांना ऑटोरिक्षाच्या डाव्या बाजूनेच उतरवावे तसे न केल्यास सदर ऑटोरिक्षावर परवाना निलंबनाची विभागीय व दंडनीय कार्यवाहीत १५ जानेवारी २०२४ पासून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची सर्व ऑटोरिक्षा चालकांनी नोंद घ्यावी.

फ्रंट सीटवर प्रवासी बसविल्यास दंडात्मक कार्यवाही

तसेच ऑटोरिक्षा चालकाने बाजूला फ्रंट सीटवर प्रवासी बसवून वाहतूक केल्यास वाहनावर परवाना निलंबनाची विभागीय कार्यवाही १ जानेवारी २०२४ पासून पुढीलप्रमाणे वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

                 असे आहे गुन्ह्याचे स्वरूप

ऑटोरिक्षा चालकाच्या बाजूला फ्रंट सीटवर प्रवासी बसवून वाहतूक करणे आणि ऑटोरिक्षामध्ये उजव्या बाजूने प्रवासी उतरु नये करीता उजव्या बाजूचे दार लोखंडी सळी लावून बंद करणे, तसे न केल्यास हिला गुन्हा १० दिवस परवाना निलंबन किंवा ५०० रुपये दंड. दुसरा गुन्हा २० दिवस परवाना निलंबन किंवा १ हजार रुपये दंड तर तिसरा गुन्हा ३० दिवस परवाना निलंबन किंवा २ हजार रुपये पर्यंत परवाना निलंबनाची विभागीय व दंडनिय कार्यवाही करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here