Home वरोरा संतापजनक :- वंधली निलजई आमडी सोईटच्या रस्ते बांधकामात निकृष्ट दर्जाचे मटेरियल?

संतापजनक :- वंधली निलजई आमडी सोईटच्या रस्ते बांधकामात निकृष्ट दर्जाचे मटेरियल?

वाळू व सिक्स एमएम च्या बदल्यात गिट्टीच्या डस्टचा वापर, झालेले बंधकाम तोडण्याची व कंत्राटदार गुन्हा दाखल करण्याची मागणी.

वरोरा प्रतिनिधी :-

मागील अनेक वर्षांपासून वंधली निलजई आमडी सोईटच्या रस्त्याची दुर्दशा झाल्याने दुचाकी व चार चाकी वाहनांना त्या रस्त्यावर चालणे अवघड झाले होते, दरम्यान परिसरातील गावांच्या नागरिकांची मागणी कित्तेक वेळा पालकमंत्री व इतर लोकप्रतिनिधीकडे मागणी व त्यासाठी पाठपुरावा सुरु होता, त्यामुळे अनेक दिवसापासून राखडलेला हा रस्ता शेवटी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतर्गत मंजूर झाला, मात्र हे काम सुरु करण्यात आले खरे पण कंत्राटदार कोण हे कोण आहेत याची गुप्तता पाळण्यात आली आणि स्थानिक आमदार यांनी उदघाटन करून कंत्राटदारांनी कामाला सुरुवात केली पण या कामात सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून या रस्त्याची गुणवंत्ता मातीत मिसळली जातं आहे व तब्बल 14 कोटी 88 लाख 60 हजार च्या रस्ते बांधकामात मोठा भ्रष्टाचार केल्या जातं आहे. या रस्ते बांधकाम करणारे कंत्राटदार जे कुणी असेल त्यांनी त्वरित या रस्त्याची गुणवत्ता सुधारली नाही तर या रस्त्याचे बांधकाम तोडून नवीन रस्ता बांधकाम करण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते.

रस्ता बांधकाम करतांना जर रेती ची कमतरता असेल तर त्या बदल्यात सिक्स एम एम गिट्टी (चुरी) चा वापर करण्याची मुभा कंत्राटदार यांना आहे मात्र या रस्ते बांधकामात सिक्स एम एम अवैजी सरसकट गिट्टी क्रशर मधून निघणारी डस्ट वापरल्या जातं असून या मटेरियल चा वापर दोन छोटे पूल बांधण्यात केला असल्याने ते पूल कधीही पडू शकतात पर्यायाने या रस्त्यांची काही महिन्यातच वाट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कित्तेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचे बांधकाम होउन नागरिकांना राहत मिळेल अशी अपेक्षा असताना शासनाच्या पैशातून निकृष्ट दर्जाचा रस्ता बनत असेल तर अशा भ्रष्टाचारी व्यवस्थेला गाडून टाकायला हवे व ज्या सार्वजनिक बांधकामं विभागाकडे याची देखरेख आहे त्यांच्यावर पण कंत्रादारसह गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी या परिसरातील नागरिक करत आहे.

व्हायरलं व्हिडीओ वरून कामाचा दर्जा दिसला,

जवळपास 15 कोटी चा रस्ता निकृष्ट दर्जाचा होतं असल्याचे एका व्हायरलं व्हिडीओ वरून लक्षात येत आहे, सिक्स एम एम गिट्टी च्या मोबदल्यात चक्क गिट्टी क्रशर ची डस्ट मिसळून मिक्सर मध्ये मसाला तयार करण्यात येत आहे ते अत्यंत दुर्दैवी असून निकृष्ट दर्जाचे हे मटेरियल वापरणाऱ्या कंत्राटदाराच्या बांधकामची गुणवंत्ता लक्षात येत आहे त्यामुळे त्वरित या मटेरियल च्या माध्यमातून बनविण्यात येत असलेले बांधकाम तोडण्यात यावे

अशी मागणी होतं आहे.

Previous articleप्रियदर्शिनी सभागृहात संजय गांधी निराधार योजना महामेळावा संपन्न अध्यक्ष श्री. ब्रिजभूषण पाझारे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजन
Next articleक्राईम :- वणी तालुक्यातील मौजा-शिंदोला-२ घाटातून बेकायदेशीर रेती वाहतूक व विक्री.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here