Home वरोरा आजपासून मनसेची वरोरा भद्रावती तालुक्यात तीन दिवस “नवनिर्माण जागर यात्रा.”

आजपासून मनसेची वरोरा भद्रावती तालुक्यात तीन दिवस “नवनिर्माण जागर यात्रा.”

शेतकरी, शेतमजूर,कामगार, महिला व विद्यार्थी यांच्या हक्क अधिकारासाठी होणार जागर.यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन.

वरोरा:-

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विविध आंदोलन करून जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न चालवलेला आहे, शेतकरी कर्जमाफी आंदोलन असो की पीक विम्याचे पैसे मिळविण्यासाठीचे आंदोलन असो की शेतकऱ्यांच्या शेत पिकात टॉवर कंपनी च्या मोबदल्यासाठीचे आंदोलनं असो शेतकऱ्यांची बाजू मनसेने नेहमी घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे जनतेला त्यांच्या हक्क अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी व आपल्यां हक्क अधिकाराची लढाई लढण्यास बळ देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्क्के यांच्या पुढाकाराने दिनांक 7 मार्च ते 9 मार्च 2024 दरम्यान “नवनिर्माण जागर यात्रा” आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे वरोरा भद्रावती तालुक्यात दिनांक 7 मार्चं 2024 ते 9 मार्च 2024 दरम्यान निघणारी ही “नवनिर्माण जागर यात्रा” या परिसरातील शेतकरी,शेतमजूर, कामगार, युवा बेरोजगार, महिला व विद्यार्थी यांच्या हक्क अधिकाराची जाणीव करून देऊन व या क्षेत्रात नवनिर्माण कारण्यासाठी प्रबोधन करणार आहे. ही यात्रा दिनांक 7 मार्च 2024 ला भद्रावती येथील भद्रनाथ मंदिर तेथून सकाळी 10 वाजता निघणार आहे

*असा असेल जागर यात्रेचा मार्ग.*

भद्रावती भद्रानाथ मंदिर ते मांगली मासळ, बेळगाव चंदनखेडा,कोकेवाडा विल्लोडा, काटवल, मुधोली,मुधोली, घोसरी,वडाला आष्टा काटवल, कोकरी आगरासागरा पिरली डोंगरगाव, टाकळी, पान वडाळा नंदोरी,पळसगाव कुसना माजरी,

*8 मार्च 2024 रोज शुक्रवार, सकाळी 10.00 वाजता*

वरोरा, वनोजा, चरूरखटी, वंधली, माढेळी, केळी, नागरी, खरवड, वाघनक, चिकणी, दहेगाव, मोहबाळा, टेमुर्डा, भटाळा, शेगाव, चारगाव, वायगाव

*9 मार्च 2024 रोज शनिवार सकाळी10 वाजता*

बेंबळ, वाढधा सखारा उमरी मोखाला सुसा महालगावा बोडाखा कोठा वाघेडा कोसरासार खांबाडा, मजरा चिनोरा, आनंदवन, वरोरा डॉ आंबेडकर चौक येथे सभा सायंकाळी 7.00 वाजता सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या जाहीर सभेची प्रोजेक्टर वर प्रदर्शन व सायंकाळी 9.30 वाजता समारोप होणार आहे.

वरील नवनिर्माण जागर यात्रेत जवळपास 100 ते 150 मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, युवा बेरोजगार व विद्यार्थी सहभागी होणार असून ही यात्रा शांततेत व शिस्तवद्धपणे राहणार आहे तरी या जागर यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन राहुल बालमवार (जिल्हाध्यक्ष), राजु कुकडे (जिल्हा उपाध्यक्ष), विनोद सोनटक्के जिल्हा सचिव, उमाशंकर तिवारी, महेश वासलवार (वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष), मनोज तांबेकर (रोजगार जिल्हाध्यक्ष), सुनील गुढे, रमेश काळबांधे (जनहित जिल्हाध्यक्ष), आनंद बावणे (शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष), महेश शास्त्रकार (व्यापारी सेना जिल्हाध्यक्ष), मंदा वरखडे, रेवती इंगोले, विभा बेहरे, विशाल देठे, राम पाचभाई, मोहित हिवरकर, प्रशांत बदकी, गजू वादाफळे, युगल ठेंगे, शरद खारटकर, महेंद्र गारघाटे, मनोज डांगे, अश्विन रायपुरे, किशोर धोटे, पवन ढोके, गिरीधर पिसे, सुनील भोयर, पंकज पेटकर, संदीप मोरे, राजेंद्र धाबेकर, धनराज बाटबरवे, दिलीप उमाटे, श्रीकांत तळवेकर, सुनील पाझारे, मनोज गाठले, प्रतीक मुडे, प्रभाकर भोयर, सुधाकर ठाकरे, भदुजी गिरसावळे, गुलाबराव गुळघाणे, शेखर कारवटकर, शंकर बोरघरे, श्रीकृष्ण पाकमोडे, अशोक गाते, प्रमोद हणवते, सतीश हाके, उत्तम चिंचोलकर, ज्ञानेश्वर खांडेकर, बाळू गेडाम, विक्की येरणे, शंकर भोगेकर, महादेव वरखडे, विजय चिकटे, बाळकृष्ण बलकी, राजू पिंपळकर, पवन खापने, आनंद गेडाम, रामा डुकसे, दीपक सोनटक्के, रंगनाथ पवार, आदेश इंगोले, वैभव महल्ले, रत्नदीप नरड, दिनेश भोसकर, सोनू बेसरकर, रवी गौरकार,बाबाराव सिडाम इत्यादीनी केले आहे.

Previous articleजनता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची उत्कर्ष साठी निवड….
Next articleमा. आमदार किशोरभाऊ जोरगेवार – चंद्रपूर विधानसभा यांचे रविवार दि. 10/03/2024 रोजी कार्यक्रमाचे स्वरूप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here