Home वरोरा संतापजनक :- वरोरा तालुक्यात बसंतसिंग या कंत्राटदाराचे निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधकामे?

संतापजनक :- वरोरा तालुक्यात बसंतसिंग या कंत्राटदाराचे निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधकामे?

जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग साखर झोपेत, कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करून जनतेच्या पैशाची उधळपट्टी?

वरोरा :-

वरोरा भद्रावती तालुक्यात जी अनेक रस्ते बांधकामे सुरु आहेत, त्यात बसंतसिंग या परप्रांतीय कंत्राटदार यांची कोट्यावधीची कामे सुरु आहेत, स्थानिक मराठी माणसाला ठेकेदारीतून हद्दपार करत बसंतसिंग या कंत्राटदाराला स्थानिक लोकप्रतिनिधिचा राजाश्रय मिळाला आहे, त्यामुळे त्यांनी जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांना टक्के देऊन निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधकाम चालवले असल्याचे संतापजनक प्रकार समोर येत आहे.

वरोरा तालुक्यातील एकीकडे माढेळी नागरी रस्ते बांधकाम सुरु आहेत त्यात जो मुरूम वापरल्या जात आहे तो मातीपेक्षाही खराब आहे तर दुसरीकडे वंधली निलजई आमडी बोरी येथे रस्ते बांधकाम सुरु आहेत, तिथे पण तीच परिस्थिती आहे, दरम्यान याचे कंत्राट बसंतसिंग यांचे असून ते रस्ते बांधकामं निकृष्ट दर्जाचे सुरु आहेत, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियत्यांना टक्के मिळत असल्याने ते साखर झोपेत आहे, दरम्यान रस्ते बांधकाम करताना जे मटेरियल ज्या प्रमाणात वापरायला पाहिजे ते मटेरियल कुठेही दिसत नसून गावागावाला जोडणाऱ्या रस्त्यांचे बांधकामं निकृष्ट झाल्याने काही दिवसातच रस्त्यावर खड्डे पडणार आहे,

अगोदरच तालुक्यात रस्त्यावर खड्डे पडले असल्याने दुचाकी सुद्धा चालवणे कठीण जात असताना आता अनेक वर्षांपासून रस्ते बांधकाम रखडले होते ते सुरु झाले असतांना ते रस्ते बांधकामचं निकृष्ट दर्जाचे सुरु असेल तर मग पुन्हा ते रस्ते उखडतील व खड्डे पडून पुन्हा तीच परिस्थिती होईल त्यामुळे जनतेच्या पैशाची जणू उधळपट्टी सुरु असून या रस्ते बांधकामची उच्चस्तरीय चौकशी करून कंत्राटदार बसंतसिंग यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here