Home वरोरा विशेष :- सालोरी येथे श्री संत भिमा भोई जयंती उत्सवात संपन्न.

विशेष :- सालोरी येथे श्री संत भिमा भोई जयंती उत्सवात संपन्न.

.गावात चौकाचौकातून रैली काढत दिल्या घोषणा, महिला पुरुष एकत्र येऊन दिले ऐकतेचे दर्शन.

सालोरी प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यात मोठी लोकसंख्या असलेल्या गावापैकी एक असलेलं सालोरी गाव हे श्रमिकांचं गाव म्हणून परिचित आहे, कारण या गावात पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोकं मोलमजुरी व वरोरा शहरातील दुकानात काम करतात, दरम्यान कुठलाही सण असो की सामाजिक कार्य असो येथीप युवक मात्र तिथे सहभागी होतं असतात असाच एक उत्सव मागील वर्षी संदीप मोरे, एकनाथ पडाल, रंगनाथ पवार, गणेश तुमसरे, वाल्मिक मोरे विकास तुमसरे व इतर युवकांनी एकत्र येऊन भोई समाजाचे आराध्य दैवत श्री संत भीमा भोई जयंती उत्सव साजरा कारण्याचं कार्य सुरु केलं आणि आता दरवर्षी हा उत्सव सुरु राहणार आहे.

श्री संत भीमा भोई जयंती उत्सव यावर्षी मोठया उत्सवात साजरा करतांना भोई समाजातील असंख्य स्त्री पुरुष यांनी सहभाग घेतला, भोई समाजाला जुने वैभव प्राप्त व्हावे आणि समाज सुखी संपन्न व्हावा हा संदेश देण्यासाठी हा जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात आल्याची माहिती या कार्यक्रमाचे संयोजक संदीप मोरे यांनी दिली.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वाल्मीक मोरे, मनोज श. बावणे, एकनाथ पढाल, विकास म. तुमसरे, संभाजी तुमसरे, राहुल मोरे, कुंदन मोरे, रामकृष्ण मोरे, नयन तुमसरे, निखिल मोरे, सुमित मोरे, कुलदीप मोरे, सूजल मोरे, सुमित पोईंकर, आशिष मोरे, प्रेम मोरे, प्रफुल बावणे, राहुल पोइंकर, प्रकाश भडके, श्रीधर मोरे, विठल तुमसरे, राजू शिरपूरकर, सुरज मोरे, ऋतिक दाते, मधुकर मोरे, प्रमोद मोरे, सुनील मोरे, विनोद मोरे मायाबई मोरे, कल्पना तुमसरे, वर्षा तुमसरे, शारदा बाई मोरे, संगीता मोरे, रिना स.मोरे, मयूर पडाल, अनुप तुमसरे, कुणाल तुमसरे, दिवाकर मोरे, रंगनाथ पवार, गणेश तुमसरे, संदिप मोरे, सुभाष बावने, नामदेव बावणे अवी पडाल शुभम मोरे वामन मोरे सागर मोरे विष्णू तुमसरे तसेच सर्व भोई समाज बांधव व माता भगिनी व गावातील इतर समस्त नागरिक रॅलीत सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here