Home Breaking News मतमोजणीची तयारी पूर्ण; गुलाल कोण उधळणार ?

मतमोजणीची तयारी पूर्ण; गुलाल कोण उधळणार ?

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :- लोकसभा निवडणूक निकालाचे काउंटडाउन सुरू झाले आहे. मतमोजणीला अवधा एक दिवस शिल्लक आहे. त्यामुळे आता साऱ्यांचीच धाकधूक वाढली आहे. कोण जिंकणार, कोण हरणार, गुलाल कोण उधळणार यावर मंगळवारी ४ जूनला शिक्कामोर्तब होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून डोळ्यात तेल घालून अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक यंदा अनेक राजकीय घडामोडींनी चर्चेत आली. त्यामुळे विजयी माळ कुणाच्या गळ्यात पडणार याविषयीची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे, मंगळवारी दुपारी १ ते दीड वाजेपर्यंत निकालाचा कल समजू शकणार आहे,

                 प्रथम टपाली मतदानाची मोजणी

मंगळवारी सकाळी ८ वाजता सुरुवातीला टपाली मतदानाची मोजणी केली जाणार आहे. त्यानंतर अर्धा तासात अर्थात साडेआठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्याआधी पहिल्या फेरीसाठी लागणारे मतदान यंत्र त्या त्या मतमोजणी टेबलवर ठेवले जाणार आहेत.

                       प्रशासनाची धावपळ

लोकसभा निवडणूक निकालासाठी प्रशासनाची सध्या धावपळ बघायला मिळत आहे. जिल्हाधिकारी प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. १२२ पर्यवेक्षक, १४० सहायक आणि ११७ सूक्ष्म सहायक असे एकूण ३७९ अधिकारी, कर्मचारी मतमोजणीच्या कामाला राहणार आहेत. या व्यतिरिक्त इतर कामांसाठीही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

                   राखीव कर्मचारी राहणार

प्रत्यक्ष मजमोजणीसाठी नियुक्त्त करण्यात आलेल्या कर्मचायांसह काही राखीव कर्मचारीही राहणार आहेत. आकडेमोड करण्यासाठी कर्मचारी, संगणकात आकडे भरण्यासाठी वेगळे कर्मचारी आणि मतदान यंत्र वाहून नेण्यासाठी कर्मचारी तैनात राहणार आहेत. याशिवाय राखीव कर्मचारीदेखील राहणार आहे. कडक पोलिस बंदोबस्तासह, विविध विभागांचे कर्मचारीही येथे उपस्थित राहणार आहेत.

                सीसीटीव्ही आणि भोंगेही राहणार

मतमोजणीच्या ठिकाणी आतमध्ये तसेच बाहेर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. तसेच निकाल सांगण्यासाठी विविध ठिकाणी लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here