Home Breaking News मुलगा, सून सांभाळत नाही; या हेल्पलाइनवर करा कॉल !

मुलगा, सून सांभाळत नाही; या हेल्पलाइनवर करा कॉल !

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  ज्येष्ठ नागरिकांना घरगुती समस्यांसह अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, त्यांना मदत मिळावी, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने ‘एल्डरलाइन’ ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी या हेल्पलाइनवर कॉल केल्यास तक्रारीची तत्काळ नोंदणी करून पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येते.

राष्ट्रीय सामाजिक संस्था, सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभाग, राज्य शासन आणि जनसेवा फाउंडेशनच्या वतीने हेल्पलाइन चालविली जाते. उतार वयात नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. ज्येष्ठांच्या मदतीसाठी ही हेल्पलाइन सुरू केली आहे. संकटग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना माहिती, मार्गदर्शन आणि भावनिक आधार मिळतो. त्यामुळे ही हेल्पलाईन अनेक ज्येष्ठांना फायदेशिर ठरत आहे.

                     मदतीसाठी १४५६७ हेल्पलाइन

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व तक्रारीवर निवारणासाठी केंद्र सरकारच्या वतीने १४५६७ हा हेल्पलाइन क्रमांक आहे. हा टोल फ्री क्रमांक असून यावर माहिती मार्गदर्शन व भावनिक आधार दिला जातो.

सकाळी ८ ८ ते रात्री आठपर्यंत करा कॉल

■ ही हेल्पलाइन सकाळी ८ ते रात्री ८

वाजेपर्यंत वर्षांचे २२ महिने सुरू असल्याने ज्येष्ठ नागरिक काहीही अडचण आल्यास या वेळेतच कॉल करू शकतात.

■ या हेल्पलाइनमुळे अनेक ज्येष्ठांना आधार मिळत आहे.

■ मात्र बहुतांश ज्येष्ठांना याबाबत माहितीच नसल्याचे दिसून येते.

कोणत्या मदतीसाठी करता येतो कॉल

मुलगा सुनेच्या तक्रारी, संपत्तीचा वाद, वृद्धाश्रम, कायदेविषयक सल्ला यांसह विविध समस्यांसाठी ज्येष्ठ नागरिक या हेल्पलाइनवर कॉल करून मदतीची अपेक्षा करत असतात.

माहितीसाठी जनजागृतीची गरज

■ ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाइन आहे, याबाबत ज्येष्ठांना

माहितीच नाही; तसेच ज्येष्ठांच्या योजनाही माहिती नाही. त्यामुळे जनजागृती करण गरजेचे आहे.

■ बरेच ज्येष्ठ नागरिक मदतीविना त्रास सहन करत असतात.

भरोसा सेलमध्येही ज्येष्ठांना आधार

■ चंद्रपूर भरोसा सेलकडेसुद्धा ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात जात असतात.

■ सून नीट जेवण वाढत नाही, टोचून बोलत असते, अशा विविध प्रकारच्या तक्रारी घेऊन ज्येष्ठ नागरिक पोलिस ठाण्यात जातात. त्यावेळी त्यांना भरोसा सेलकडे पाठविण्यात येते. समुपदेशन केले जाते किंवा एसडीओकडे पाठवले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here