Home वरोरा अभिनंदनीय :- अल्का पचारे यांची भोई समाज संघटना भारत च्या महिला विदर्भ...

अभिनंदनीय :- अल्का पचारे यांची भोई समाज संघटना भारत च्या महिला विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती.

सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या अल्का पचारे यांच्या नियुक्तीने भोई समाज बांधवानी केले अभिनंदन व पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा.

वरोरा प्रतिनिधी : –

चंद्रपुर जिल्हातील वरोरा येथील भोई समाजाच्या युवा नेतृत्व असलेल्या व निस्वार्थ भावनेने महिलांसाठी, विद्यार्थ्यांनसाठी सतत समाज कार्य करणाऱ्या सौ अल्का योगेश पचारे यांची भोई समाज संघटना भारत या संघटनेच्या महिला विदर्भ अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. भोई समाज संघटना भारत कार्यकारीणीची सभा नांदेड येथे दि.२३/०६/२०२४ रोजी संपन्न झाली होती, भोई समाज हा वंशपरंपरेने मासेमारी करणारा समाज असुन हा समाज भारत भर अस्तिवात आहे, हा अशिक्षित समाज असुन उच्चशिक्षीत नाही त्यामुळे भोई समाजाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी व शासनांच्या योजनांचा लाभ तसेच शैक्षणीक, सामाजिक, व आर्थिक लाभ देण्याकरीता महिला सक्षमिकरण होणे गरजेचे आहे त्यासाठी अल्का पचारे या युवा महिलाकडे विदर्भाचे नेतृत्व दिल्याने भोई समाज संघटना भारत ही संघटना मजबूत होईल व त्यामुळे ही संघटना समाजाच्या पाठीशी खंभीरपणे उभी राहील असे आश्वासन नवनियुक्त विदर्भ अध्यक्ष अल्का पचारे यांनी भोई समाज बांधवाना दिले.

अल्का पचारे यांची नियुक्ती संघटना प्रमुख भाई नानासाहेब लकारे, प्रदेश उपाअध्यक्ष, इंजि, सत्यम शिंगाणे, प्रदेश उपाध्यक्ष, डॉ. पी. ए सावंगीकर प्रदेश सचिव श्री पकंज सोनोने,विदर्भ अध्यक्ष श्री रमेशराव नांदने विदर्भ सचिव आत्माराम मात्रे यांनी केली असुन पदाधीकारी व प्रदेश उपाध्यक्ष देविदास मोरे मुख्य मार्गदर्शक, राजु मामुलवार मार्गदर्शक अध्यक्ष, प्रा. आविनाश कांबळे सांगली पश्चिम विभाग प्रमुख श्री हिरालाल बिरुटे प्रदेश सदस्य डॉ. दत्ता सावंगीकर अध्यक्ष मराठवाडा यांनी नियुक्ती करून सामाजीक भावी वाटचालीस सर्वानी हार्दीक शुभेच्छा दिल्या….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here