Home वरोरा चिंतनीय :- वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील त्या संभावित उमेदवारांच्या सर्वेचे काय?

चिंतनीय :- वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील त्या संभावित उमेदवारांच्या सर्वेचे काय?

Online survey on a tablet. Flat style vector illustration isolated on white background.

स्वतःच्या समर्थ्यकांच्या मतांनी ऑनलाईन सर्वे करून खरंच कुणाच्या राजकीय यशाचं गणित मांडलं जाणार का? एक विश्लेषण.

वरोरा प्रतिनिधी :-

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकींनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भावी आमदार होण्याची स्वप्ने दिवसाढवळ्या काही संभावित उमेदवारांना पडायला लागली आहे, खरं तर स्वप्नं पाहणं आणि त्या स्वप्नात चंदेरी नगरीचे दर्शन घेऊन आनंदी होणं हें अगदी कुणालाही पैसे न देता मोफत मिळतं, त्यामुळे स्वप्नाच्या जगात वावरणाऱ्यां त्या उमेदवारांना आमदार झाल्यासारखं वाटणं स्वाभाविक आहे, लोकशाहीनं तो सर्वाना अधिकार पण दिला आहे, तशाच काहींच्या चूरसकथा वरोरा विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने ऐकायला मिळत आहे, जर काहीही नं करता पैसे वाटून आमदार बनता येते तर आपण पण पैसे वाटून आमदार बनू अशी काहींची मंशा आहे तर आपण सामाजिक कार्यात आहो त्यामुळे लोकं आपल्यालाच मतदान देतील, मात्र काहींना वाटते माझ्या जातीची इतकी इतकी मते आहे त्यामुळे मी निवडून येईल, दरम्यान काहींना आपल्या पक्षाच्या संभाव्य मजबूत उमेदवारीवर भरोसा असल्याने त्यांना निवडणूकीतील यशाचं गणित दिसत आहे आणि यामुळेच काही सम्भावीत उमेदवारानी आपल्या समर्थकांना लिंक पाठवून व त्यांचे मतदान दाखवून पक्ष जनमत आपल्या बाजूने असल्याचा दिखावा सुरू केला आहे, पण हें सर्वे जनमतांचे नाही आणि अजून विधानसभा निवडणुकीत युत्या आघाड्या व्हायच्या आहे, स्वतंत्र लढण्याची ताकत असलेले फार कमी उमेदवार आहे पण नेतृत्वाकडे दावेदारी करायची असल्याने स्वतःला मतं देण्याच आवाहन करून वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात सध्या चार पाच लिंक व्हायरलं होतं असून त्या सर्वे च्या आधारे जनमत आपल्या बाजूने असल्याचे दाखवण्याची चढाओढ सुरू असल्याची चर्चा आहे. पण स्वतःच्या समर्थकाकडून मताचे ऑनलाईन सर्वे करून खरंच कुणाच्या राजकीय यशाचं गणित मांडलं जाणारं का? हा चिंतनाचा भाग बनला आहे.

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात कांग्रेस विरोधात शिवसेना अशी लढत होतं असली तरी मागील निवडणुकीत मनसे फॅक्टर पण जोरात चालला होता, नवख्या राजूरकर यांनी मनसेच्या इंजिनावर लढत तब्बल 35,हजार मतदान घेत मनसेची ताकत दाखवली होती, मात्र जे 35 हजार मतदान मिळाले ते मनसे पक्षाचे नव्हे तर माझे व्यक्तिगत मतदान आहे असा साक्षातकार झालेल्या राजूरकर यांनी पलटी मारली आणि भाजप मध्ये प्रवेश केला, दरम्यान भाजप प्रवेश करतेवेळी राजूरकर यांच्यासोबत मनसेचा एक पदाधिकारी तर सोडाच एक कार्यकर्ता सुद्धा भाजप मध्ये गेला नाही आणि आता भाजप मध्ये राजूरकर यांची काय अवस्था आहे हें सर्वांना माहीतच आहे. पण कांग्रेस शिवसेना अशी होणारी या क्षेत्रातील लढत बहुरंगी होणार आहे, महायुती व महाविकास आघाडी च्या उमेदवाराला मनसे व अपक्ष उमेदवार हें जोरदार टक्कर देणारं आहे, या लढतीत कोण कुठे राहणार हें येणाऱ्या काळातच दिसणार आहे, पण जनमत माझ्याच बाजूने असल्याचे स्वयंघोषित सर्वे ज्यांनी ज्यांनी सुरू केले त्यांना पक्षाची उमेदवारी मिळेल का? आणि मिळाली नाही तर अपक्ष उमेदवार म्हणून जनतेच्या मनातून मतदान आपल्या बाजूनं वळविण्यात यशस्वी ठरणार का? याबाबत मात्र सभ्रम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here