Home वरोरा राजकीय :- मनसेच्या वरोरा येथे “राजगड” या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन.

राजकीय :- मनसेच्या वरोरा येथे “राजगड” या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन.

राजगड कार्यालयात भरणार जनता दरबार, जनतेचे प्रश्न सोडविण्यास मनसे पदाधिकाऱ्यांचा निर्धार.

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोठया प्रमाणात गावनिहाय शाखा असून मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात जनतेचे प्रश्न सोडविण्याचा उपक्रम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे, दरम्यान जनतेच्या प्रश्नांची गाऱ्हानी एकाच ठिकाणाहून ऐकून त्याचा पाठपुरावा प्रशासनासोबत करण्यासाठी आता वरोरा शहरातील वीर सावरकार चौक येथील “राजगड” या कार्यालयातून सुरुवात होणार आहे, त्या कार्यालयाचे उदघाटन काल दिनांक 23 जून 2024 ला मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष उमाशंकर तिवारी, महेश वासलवार, जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष सुनील गुढे, रमेश काळबांधे जिल्हा सचिव विनोद सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, विशाल देठे, मोहित हिवरकर, दीपक देशमुख, प्रतीक मुडे, धनराज बाटबरवे, शहर अध्यक्षा शेट्टे मॅडम तेजू रेड्डी, गिरीधर पिसे इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती.

येणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असतांना त्यात मनसे पक्ष पण मागे नाही, सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी नेते हें गुडघ्याला बाशिंग बांधून विधानसभा निवडणुकीत आपल्यालाचं उमेदवारी मिळेल या आशेने कामाला लागले आहे असतांना मनसेने मात्र आपल्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार घेऊन जनतेचे प्रश्न सोडविण्याचा पर्याय निवडला आहे, अशातच मनसेचं “राजगड” कार्यालय हें जनतेच्या हक्काचं न्यायालय ठरेलं असा आशावाद मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here