Home क्राईम स्टोरी क्राईम :- नीट पेपर फुटी प्रकरणात जलील खा पठाण सह संजय जाधव...

क्राईम :- नीट पेपर फुटी प्रकरणात जलील खा पठाण सह संजय जाधव अटकेत.

राज्यातील चारही आरोपींचा संपर्क दिल्ली येथील गंगाधर नावाच्या व्यक्तीसोबत असल्याचं पोलीस तपासात उघड. आणखी खुलासे होणार?

न्यूज नेटवर्क :-

नीट पेपर फुटी प्रकरणात नवीन खुलासे होत असून या प्रकरणातील आरोपी संजय जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे . वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याची लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे. पेपर फुटी प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. यात आतापर्यंत फक्त जलील खा पठाण एकमेव आरोपी पोलिसांच्या ताब्यात होता. मात्र, लातूर पोलिसांनी संजय जाधवला पकडण्यात यश मिळवले असून अजून दोन आरोपीचा पोलीस शोध घेत आहे.

नीट पेपर फुटी प्रकरण राज्यातच नव्हे तर देशात सध्या गाजत आहे, या प्रकरणात लातूर कनेक्शन समोर आलं असतांना देशात गदारोळ घातलेल्या नीट पेपरफुटीचे धागेदोरे थेट महाराष्ट्रात असल्याचे स्पष्ट jhale आहे. या प्रकरणात जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक जलील पठाण आणि संजय जाधव व इतर दोन अशा एकूण चार आरोपींची नावं समोर आली होती. जलील पठाणला दोन दिवसापूर्वी पोलिसांनी अटक केली होती. काल कोर्टासमोर त्यांना हजर केलं असता सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. संजय जाधव या जिल्हापरिषदेच्या शिक्षकाचा शोध पोलीस शोध घेत होते. दरम्यान लातूर पोलिसांनी संजय जाधवला अटक केली आहे. शिक्षक संजय जाधव याची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.

नीट च्या पेपरफुटी प्रकरणातील चार आरोपी नेमके कोण?

नीट पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींचं कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. लातूर येथील संजय जाधव, जरील खान, उमरखान पठाण यांचा अजून एक साथीदार याच भागातील आहे. इरणणा कोनगलवार, असं या प्रकरणातील चौथ्या आरोपीचं नाव असून धाराशिवमधील उमरगा जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. या चारही आरोपींचा संपर्क दिल्ली येथील गंगाधर नावाच्या व्यक्तीसोबत असल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच, नीट परीक्षेच्या पेपर्सच्या व्यवहारात दिल्लीतील व्यक्तीचा मोठा हात असल्याची माहिती समोर आली आहे.

नीट पेपरफुटीचं रॅकेट नेमकं आहे तरी काय?

नीट परीक्षांमधील घोटाळ्यानं देशभरातली विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा धक्का बसलेला आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले संजय जाधव आणि उमरखान पठाण यांच्या मोबाईलमध्ये बारा विद्यार्थ्यांचे अॅडमिट कार्ड सापडले होते, यावरुन हे स्पष्ट होतं की, हे लोक या विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन त्यांना परीक्षेपूर्वी पेपरची माहिती देत होते. त्यानंतर काही रक्कम स्वतःकडे ठेवून घेऊन उरलेली रक्कम दिल्ली येथील गंगाधर नावाच्या व्यक्तीला पाठवत होते. त्यांच्या बँकेत खात्यातून मोठ्या प्रमाणातली आर्थिक उलाढाल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे, उत्तरेकडील राज्यात झालेल्या पेपर फुटी प्रकरणातील आरोपींची बँक खाती पोलिसांनी तपासल्यानंतर लातूरची लिंक लागल्याची माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here