Home वरोरा धक्कादायक :- टेमुर्डा येथे देशी दारू दुकानाच्या मंजुरीला महिलांनी दिला धक्का?

धक्कादायक :- टेमुर्डा येथे देशी दारू दुकानाच्या मंजुरीला महिलांनी दिला धक्का?

ग्रामसभेत देशी दारू दुकानाविरोधात महिलांनी 102 विरुद्ध 121 असा ठराव जिंकून अंजु अन्नाची उडवली दांडी? आज पुन्हा आमसभेत परीक्षा होणार?

टेमुर्डा / वरोरा प्रतिनिधी :-

टेमुर्डा येथे देशी दारू दुकान सुरू करण्यासाठी ज्या पद्धतीने खेळी करण्यात आली ती बघता ग्रामपंचायत सरपंच सचिव यांनी अर्जदार कोण हे गुपित ठेऊन गावातील महिलांना अंधारात ठेवले व आपल्या बाजूने निर्णय करून घेण्याची रानणिती केली ती महिलांनीच उधळली असून अर्ज केलेल्या व्यक्तीचे नाव गाव न टाकता ग्रामपंचायत टेमुर्डा च्या सरपंच सचिव व सदस्यांनी एक जगावेगळा खेळ आज खेळला होता मात्र माजी सरपंच संगीता आगलावे, संगीता तिखट ग्रामपंचायत सदस्य, प्रतिभा नक्षीने, दुर्गा आगलावे, ज्योतीताई ठावरी, माधुरी अंड्रस्कर, उजवला नक्षीने, मंगला गुजरकर, लोभा वासेकर, इंदाबाई आत्राम यांच्या सतर्कतेने अन्नाचा डाव महिलांनी उधळून लावला, प्रत्येक महिलांना एक हजार रुपये देऊन महिलांच्या आमसभेत आणल्यानंतर सुद्धा त्यांच्या विरोधात ठराव बर्गळल्याने अन्नाच्या लाखों रुपयांवर पाणी फेरल्या गेले, अंजु अन्नानी काही महिलांना एक हजार रुपये देऊन आपल्या बाजूनं मतदान करण्यासाठी सभागृहात आणले खरे, पण त्यांच्या संखेच्या तुलनेत दारू दुकानाला विरोध करणाऱ्या महिलांची संख्या जास्त असल्याने अन्नाची दांडी उडवली गेली व ठराव नामंजूर करण्यात आला. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन टेमुर्डा येथे देशी दारू दुकानाला मंजुरी देऊ नये अन्यथा मनसेतर्फे आंदोलन कारण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

खांबाडा येथील अंजनेयलु सम्बया जोंगेनी हा आंध्र प्रदेशातील व्यक्ती असून तो खांबाडा येथे सन २००६ मधे आला होता तों अवैध दारू विक्रीच्या धंद्यात मोठा माफिया म्हणून ओळखल्या जातो, त्यांचेवर वरोरा भद्रावती शेगाव व इतर पोलीस स्टेशनं मध्ये अवैध दारू विक्री च्या केसेस आहेत, दरम्यान त्यांनी खांबाडा येथील एका व्यक्तीचे घर घेऊन जवळपास सन २०१० ला आकाश रेस्टॉरंट सुरू केले होते व नंतर ग्रामपंचायत सरपंच व इतर सदस्यांना पैशाची लालच देऊन बार चे बेकायदेशीर लायसन्स मिळवले, त्या दरम्यान खांबाडा तेथील महिलांनी उठाव केला परंतु त्या महिलांचे काहीएक न ऐकता तत्कालीन तहसीलदार यांनी आकाश रेस्टॉरंट ला इटिंग लायसन्स दिले व नंतर त्या लायसन्स च्या भरोशावर बार चे बेकायदेशीर लायसन्स देण्यात आले होते व आज त्याचं आकाश बार जवळ देशी दारू सुद्धा तों विकत असून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यात तों अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती आहे,

अंजु अन्नाला कुणाचा आशीर्वाद?

बाहेरील प्रांतातून आपल्या भागात आलेल्या अंजु अन्नाचा खांबाडा येथे आकाश बार व किरायाने जवळपास चार बार आहेत व बोर्डा चौकात देशी दारूचे दुकान आहेत, अवैध दारू विक्रीच्या धंद्यात त्यांचेवर अनेक पोलीस केसेस असतांना त्याची एवढी हिंमत होते की तो स्थानिक ग्रामपंचायत च्या सर्वाना खरेदी करतो व सामान्य जनतेला सुद्धा तो खरेदी करण्याचा प्रयत्न करतो अर्थात त्याच्या पाठीमागे कुठला तरी राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय एवढं धाडस बाहेरील प्रांतातील व्यक्ती करू शकत नाही, दरम्यान बेकायदेशीरपणे दारू विकताना त्यांच्या नौकरांना पोलिसांनी व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले असतांना व त्यांचे बार बंद करण्याची तक्रार होऊन सुद्धा ते बंद होत नाही याचे आश्चर्य वाटतं असून त्याला राजाश्रय मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

आज होणार आमसभेत परीक्षा?

आदल्या दिवशी म्हणजे दिनांक 18 जुलै ला घेतलेल्या महिलांच्या आमसभेत अंजु अन्नाच्या देशी दारू दुकानाविरोधात महिलांनी ठराव मांडून देशी दारू दुकानाचा मूळ ठराव नामंजूर करण्यात आला असल्याने आता आज दिनांक 19 जुलै ला आमसभेत परीक्षा होणार असून कुणाच्या बाजूने निर्णय होईल याकडे सर्वांचे लक्ष लगलेले आहे,

टेमुर्डा गावातील महिला व युवकांचा आक्रोश.

उद्या होणाऱ्या आमसभेत कुठल्याही परिस्थितीत देशी दारू दुकान मंजुरी च्या ठरावाला विरोध करून देशी दारूचे दुकान सुरू होऊ नये यासाठी टेमुर्डा गावातील महिलांनी कंबर कसली असून गावातील युवकांनी सुद्धा मोर्चा खोलला आहे, उद्या होणाऱ्या आमसभेत चोख पोलीस बंदोबस्त असला तरी जनतेत देशी दारू दुकानाविरोधातील आक्रोश बघता शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी आमसभेच्या हालचालिवर लक्ष ठेवावे लागणार आहे.

ग्रामपंचायला आकास्मिक आमसभा घेण्याची गरज काय?

कुठल्याही ग्रामपंचायची आमसभा ही ठरलेली असतें, वर्षातून किमान चार आमसभा व्हायला हव्या असा नियम आहे परंतु असे कुठलेही ठोस कारण नसताना केवळ देशी दारू दुकान मंजुरी करिता आकास्मिक आमसभा बोलावणे कुठल्या कायद्यात आहे हे कळायला मार्ग नसून एरवी गावाच्या विकासाच्या संदर्भात सजग नसलेले ग्रामपंचायत सत्ताधारी अचानक गावाचं भलं होत नसलेल्या बाबीला गांभीर्याने घेऊन चक्क तीन दिवसात आमसभा लावतात यावरून सरपंच सचिव व त्यांना समर्थन करणाऱ्यांना काय गिफ्ट मिळालं असेल ते न बोललेलं बर, पण या गावातील महिलांनी आदल्या दिवशी ठराव 102 विरुद्ध 121मतांनी नामंजूर केला त्यामुळं अंजु अन्नाचे समर्थक गार झाले असल्याचे दिसत आहे पण तरीही आज ते कुठली खेळी करताहेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here