काय पर्यवेक्षक कोमल गारघाटे एकटा दोषी? मग वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे, लेखापाल यांच्यासह संचालक मंडळातील त्या संदीग्ध व्यक्तीचे काय?
वरोरा प्रतिनिधी :-
संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या कांदा अनुदान घोटाळ्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा आता पुन्हा एक नव्या तारण घोटाळ्यात गाजणार असून त्यावेळी प्रशासक म्हणून वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे यांच्या कार्यकाळात झालेल्या त्या कांदा घोटाळ्यात त्यांना निलंबित केले होते मात्र त्यांनी उच्चं न्यायालयात धाव घेतली होती व संबंधित गुन्ह्याच्या संदर्भात निर्णय येत नाही तो पर्यंत त्यांना सचिव म्हणून कामावर रुजू करण्याचे आदेश मिळविले होते, पण भ्रष्टाचार करून आपले उखळ पांढरे करणारे शिंदे यांनी पुन्हा एक तारण घोटाळा करून वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती हा भ्रष्टाचाराचा अड्डा बनविला असल्याने शेतकऱ्यांवर मात्र इथे अन्याय होत असल्याचे चित्र दिसत आहे, दरम्यान काल दिनांक 17 ऑगस्ट ला झालेल्या वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत पर्यवेक्षक कोमल गारघाटे यांना निलंबित करण्याचा ठराव संचालक मंडळाने करून बाकींना अभय दिल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने चोर सोडून संन्यासाला फाशी चा हा प्रकार असून खरे चोर शिरजोर झाले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तारण घोटाळ्यात काय आहे तथ्य ?
जिथे महाराष्ट्रात गाजलेला कांदा घोटाळा दबला तिथे तारण घोटाळा पण दबणार अशा प्रकारची मंशा असणाऱ्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी तारण योजनाचं जणू हडपली आहे असे चित्र दिसताहेत, दरम्यान एवढी मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या नावाने वळती करण्याची हिंमत पर्यवेक्षक एकटा करूच शकत नाही आणि त्यात सचिव शिंदे लेखापाल आणि सभापती उपसभापती यांच्या स्वाक्षऱ्या असल्याशिवाय रक्कम वळती होऊच शकत नाही तर मग गारघाटे एकटा दोषी कसा? हा मोठा प्रश्न आहे, पण आश्चर्यांची बाब म्हणजे जिथे बाजार समितीत सत्ता स्थापणेसाठी ईश्वरचिठ्ठी करावी लागली होती तिथे हरलेले इच्छुक सभापती पदाचे उमेदवार यांना या प्रकरणात जबरदस्त विरोध करण्याची व ही सत्ता उलथुन पाडण्याची नामी संधी असतांना ते गप्प का? याचे कोडे सुटताना दिसत नाही. ‘तेरी भी चूप मेरी भी चूप असा रंगीन खेळ इथे चाललाय असावा अशी परिस्थिती दिसत आहे. दरम्यान तारण योजनेत 46 लाख 62 हजार 190 रुपयाच्या रक्कमेची अपरातफर झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्व संचालकांचे वारे न्यारे होईल का? की याबाबत प्रशासकीय चौकशी होऊन दोषी पदाधिकारी घरी जाणारं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ते संचालक काही मिळतंय का यासाठी तळ्यात मळ्यात?
मागील वर्षीचा वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा घोटाळा उघडकीस आला होता, तो घोटाळा 2 कोटी 30 लाख 73 हजार रुपयाचा होता. त्या घोटाळ्यात अनेक संचालकांनी आपले उखळ पांढरे करून घेतले होते आणि आता तारण योजनेत 46 लाख 62 हजार 190 रुपयाच्या रक्कमेची अपरातफर झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने इथे सुद्धा आपलं चांगभलं होतय का? यासाठी काही संचालकांनी कालच्या बैठकीत आपली भूमिका तळ्यात मळ्यातली संदीग्ध ठेवली असल्याची माहिती आहे, दरम्यान एवढे देशील तर चूप राहणार नाहीतर गणेशभाऊ सोबत मैदानात उतरणार अशी रनणिती त्यांची सुरु आहे, ते कोण संचालक आहे याबद्दल जवळपास सर्वच वाचकांना माहीत आहे, त्यामुळं आता पुढे काय? याबाबत अनेक खुलासे होणार असल्याची माहिती आहे.