अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पानवडाळाला चोखारे यांचेकडून आर्थिक मदत
चंद्रपूर :- भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचे स्थान सर्वोच्च आहे याचे कारण भारताला अनादीकाळापासून लाभलेले गुरु आणि त्यांचे ज्ञान आहे. इतिहासापासून आजपर्यंत घडून गेलेल्या कित्येक गुरुंनी त्यांच्या ज्ञानाच्या ओंजळीने आज आपल्याला दिसणारा हा ज्ञानाचा सागर भरला आहे यात काही शंकाच नाही. आजपर्यंत आनेक गुरु या देशाने आपल्याला दिले आहेत.
जे फक्त त्यांनी निवडलेल्या क्षेत्रातच चमकले नाही तर त्यांनी त्याच्या ज्ञानाच्या आणि विचारांच्या तेजाने अज्ञानाने अंधारलेला आपला देश प्रकाशित केला ज्यांनी फक्त लोकांना सज्ञानीच बनवले नाही तर एक चांगला माणूस बनण्यासाठी प्रेरित करत असल्याचे मत महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश दादापाटील चोखारे यांनी व्यक्त केले आहे.
ते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पानवडाळा येथे कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी त्याचेसह शेतकरी संरक्षण समिती चंद्रपूरचे अध्यक्ष विठ्ठलराव बदखल, पानवडाळा ग्रामपंचायतचे सरपंच प्रदीप महाकुलकर, माजी सरपंच लहू बोथले, ज्येष्ठ नागरिक एकनाथ खंगार, मनोहर वरारकर, पानवडाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यपक ओंकार घुगुल, शिक्षक लीलाधर पिपळशेंडे, नितीन मत्ते, संदीप गराटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
ते पुढे बोलतांना म्हणाले कि, देशाला योग्य आकार देण्यात शिक्षकांचा मोठा वाटा आहे. डॉ. राधाकृष्णन यांनी भारत आणि पाश्चात्य देशातील अंतर कमी करण्यास मदत केली. “परिवर्तनासाठी शिक्षण” हे ब्रीद त्यांनी तरुण पिढीला दिले. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीचा सन्मान म्हणून त्यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो असतो.
शिक्षणाबरोबरच शारिरीक म्हणजेच नाटक, नृत्य, झाडावर चढणे, फळ काढणे अशा पाठ्यक्रम बाह्य गोष्टी करण्यासाठी मुलांना प्रोत्साहीत शिक्षक करत असतात.
यावेळी त्यांनी पानवडाळा शाळेला आर्थिक मदत दिली. यावेळी शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.