Home लक्षवेधी डॉ.विश्वास झाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोभूर्णा येथील बोर्डा दीक्षित जिल्हा परिषद शाळेतील...

डॉ.विश्वास झाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोभूर्णा येथील बोर्डा दीक्षित जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका सेवानिवृत्त विजया वांढरे  यांचा सत्कार समारंभ संपन्न

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

सेवानिवृत्त बद्दल शाळेतील सर्व विद्यार्थाला एक नाही तर 2 गणेवेश वाटप सर्व विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना स्नेहभोजन

चंद्रपूर  :-  पोंभुना तालुक्यातील बोर्डा दीक्षित येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका श्रीमती विजया वांढरे मॅडम यांच्या सेवानिवृत्तच्या निमित्ताने ठेवलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमास काँग्रेस नेते डॉ विश्वास झाडे(उमेदवार-72 बल्लारपूर विधानसभा 2019) यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. तसेच त्यांचा सत्कार व पुढील निरोगी आयुष्याचा शुभेच्छा दिल्या.

शिक्षकाचे काम मुख्यत्वे विद्यार्थ्याला माणूस म्हणून प्रेरित करणे आणि वाढवणे हे असते. शिक्षक हे फक्त टेपरेकॉर्डर नाहीत जे काहीतरी वाचतात आणि काही माहिती तुमच्यापर्यंत पोहचवतात. शिक्षक म्हणजे एक अशी व्यक्ती आहे जी विद्यार्थ्याला विशिष्ट मार्गाने प्रेरित करून त्यांचे जीवन घडवत असते.

असेच एक व्यक्तीमत्व म्हणजे श्रीमती विजया वांढरे मॅडम. शिक्षक या नात्याने त्यांनी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुधारण्यासाठी सहकारी आणि शाळा समुदाय यांच्यातील सहकार्याला नेहमीच प्रोत्साहन दिले, आज जरी ते आपल्या शाळेतून रजा घेत असल्या तरी त्याचा मार्गदर्शन आपल्याला लाभत राहीलच. तसेच त्यांनी त्यांचा सत्कार समांभाला शाळेतील सर्व विद्यार्थाला एक नाही तर 2 गणेवेश वाटप केले व सर्व विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना स्नेहभोजन दिले,

हे देण्यासाठी सुद्धा खूप मोठं मन लागत आणि विजया वांढरे मॅडम यांनी ते न बोलता करून दाखवले, या वेळी उपस्थित गावच्या सरपंच रोहिनी नैताम मॅडम,मनोज बुराडे सर, सामाजिक कार्यकर्ते राकेश नैताम, उपसरपंच नरेश बुरांडे, अजय धोडरे व इतर सहकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here