तहसीलदार, सवर्ग विकास अधिकारी यांचे हात वरती, मनसे पदाधिकारी यांनी पोलिसांना दिली माहिती.पोलीस घटनास्थळी
वरोरा :-
तालुक्यातील डोंगरगाव ग्रामपंचायत ला कुठलीही बांधकाम तोडण्याची नोटीस न देता रेल्वे लाईन विस्तार संदर्भात सुरु असलेल्या कामाचे ठेकेदार यांनी ग्रामपंचायत इमारतीवर बुलडोजार चालवून तोडल्याचा धक्कादायक प्रकार आज सायंकाळी 5.30 च्या दरम्यान झाला असून या ठिकाणी ग्रामस्थाना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे आणि वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष उमाशंकर तिवारी यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक तहसीलदार, संवर्ग विकास अधिकारी व ठाणेदार यांना फोन करून घटनास्थळी भेट देण्याची विंनती केली मात्र तहसीलदार, संवर्ग विकास अधिकारी यांनी हात वरती केले, त्यामुळं उद्या दिनांक 4 ऑक्टोबर ला जिल्हाधिकारी कार्यालयावर डोंगरगाववाशी धडकणार असल्याची माहिती आहे.
तालुक्यातील डोंगरगाव येथे रेल्वे लाईन चे काम सुरु असून त्यात ज्यांच्या जमिनी गेल्या त्यापैकी काहींना त्याचा मोबदला मिळाला परंतु काही शेतकऱ्यांना अजूनही तो मिळाला नसल्याची चर्चा आहे, परंतु आता तर रेल्वे प्रशासनाने व ठेकेदारांनी कायदा हातात घेत ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सचिवला न कळवता ग्रामपंचायत खोल्यात अनेक महत्वपूर्ण दास्तावेज लोखंडी कपाटात असतांना ग्रामपंचायत इमारतीवर रेल्वे प्रशासनाने बुलडोजार चालवला आणि ग्रामस्थ्यांचे महत्वपूर्ण दास्तावेज चक्क मातीच्या ढिगाऱ्यात दबल्या गेले, दरम्यान रेल्वे प्रशासनाने ग्रामपंचायतला नवीन ग्रामपंचायत बांधायला पैसेच दिले नसतांना ही तानाशाही कुणामुळे? असा प्रश्न गावाकऱ्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष उमाशंकर तिवारी, तालुका सचिव बंडू आपटे, अजय महाकुलकार, महिला सरपंच खीरटकर, उपसरपंच बंडू खिरटकर, ग्रामपंचायत सदस्य व गावातील युवा कार्यकर्ते उपस्थित होते.