Home वरोरा सनसनिखेज :- अखेर मनसे सोडून भाजपमध्ये गेलेल्या रमेश राजूरकर यांची राजकीय आत्महत्त्या?

सनसनिखेज :- अखेर मनसे सोडून भाजपमध्ये गेलेल्या रमेश राजूरकर यांची राजकीय आत्महत्त्या?

दोन वर्षांपूर्वी भाजप प्रवेशाच्या वेळी “नवजीवन” या दैनिक वृत्तपत्राने केले होते भाकीत, करण देवतळे यांना उमेदवारी देऊन भाजप ने ठेवला आदर्श.

वरोरा :-

मागील विधानसभा निवडणुकीत वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात अगदी स्वतःच्या घराजवळ कुणी ओळखत नसलेल्या आणि कुठंलाही राजकीय वारसा नसलेल्या रमेश राजुरकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवारी दिल्यानंतर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार यंत्रणा सांभाळून राजूरकर यांना एक सक्षम पर्याय म्हणून जनतेसमोर पेश केले त्यामुळे त्यांनी तब्बल 35 हजार मतदान घेऊन प्रस्थापित कांग्रेस शिवसेना उमेदवाराला घाम फोडला होता, मात्र त्या निवडणुकीत रमेश राजुरकर यांना मिळालेली मते ही मनसेची नसून ती माझ्यामुळे मिळाली असा साक्षातकार झालेल्या रमेश राजूरकर यांना घमंड झाला आणि त्यातूनच त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करून भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला, त्यावेळी “नवजीवन” या दैनिक वृत्तपत्रात “मनसेचे रमेश राजूरकर यांचा भाजप प्रवेश म्हणजे राजकीय आत्महत्त्या?” या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करण्यात आली होती, मात्र ही बातमी राजू कुकडे यांनी जाणीवपूर्वक दिली आणि माझी बदनामी केली अशा बावट्या राजूरकर यांनी उठवल्या होत्या पण आता तीच “नवजीवन” या वृत्तपत्राची बातमी तंतोतंत खरी ठरली असून राजुरकर यांनी मनसे सोडून स्वतःची राजकीय आत्महत्त्या केल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने त्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधी रवी खाडे यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केल्या जात आहे. दरम्यान माजी पालकमंत्री स्वर्गीय संजय देवतळे यांचा राजकीय वारसा चालविणारे करण देवतळे यांना उमेदवारी देऊन योग्य निर्णय घेतला असल्याची सर्वत्र प्रतिक्रिया येत आहे.

रमेश राजूरकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अपघाताने आले असल्याचे नेहमी सर्वाना जाणवत होते कारण मनसे पक्षाची आक्रमक शैली राजुरकर यांच्यात निर्माण होणं शक्य नव्हतं, जय गुरुदेव चा नारा देत गांधींगिरी पावलाने चालणारे राजूरकर यांना भाजप च्या नरेंद्र मोदी यांचे मात्र प्रचंड वेड होते, जणू यांनी गुजरातच्या संस्कृतीला स्वतःची संस्कृती बनवली की काय असेचं वाटतं होते, कारण एकीकडे देशाच्या बैंकेतून कर्ज घेऊन विदेशात पळणाऱ्या 80 टक्के गुजराती व्यापारी आणि उद्धयोगपती यांचं ते समर्थन करत होते आणि कांग्रेस व इतर पक्षाच्या नेत्यांना खोटं ठरवत होते, अशावेळी त्यांनी स्वतःला भाजपमध्ये जायचं ठरवलं आणि ते भाजप मध्ये गेले, मात्र त्यावेळी त्यांच्यासोबत मनसेचा पदाधिकारी तर सोडाच एक कार्यकर्ता सुद्धा भाजप मध्ये गेला नाही, परंतु भाजप पक्षातर्फे मला येणारी विधानसभा पक्की झाली अशा आरोळ्या ठोकून त्यांनी भाजप पक्षाच्या कार्यक्रमात आपल्या चपला झिजवल्या व मनसे पक्षात असतांना खर्च करण्यास मागेपुढे पाहणाऱ्या राजूरकर यांनी भाजप मध्ये चिकार पैसा खर्च केला, मात्र आज भाजप ची उमेदवारी ही करण देवतळे यांना मिळाली असल्याने राजूरकर यांची राजकीय आत्महत्त्या झाली असल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here