Home चंद्रपूर दणका :- मनसेच्या आंदोलनाला घाबरून सनविजय कंपनीत शेकडो परप्रांतीय कामगार हादरले.

दणका :- मनसेच्या आंदोलनाला घाबरून सनविजय कंपनीत शेकडो परप्रांतीय कामगार हादरले.

दहा ते बारा फूट भिंती ओलांडून परप्रांतीय कामगारांचा पळ, मराठी कामगारांनी त्यांना पकडले.

ताडाळी एमआयडीसी मधील सनविजय कंपनी व्यवस्थापन स्थानिक मराठी कामगारांचा छळ करत असून एका कामगाराचा अपघात झाल्यानंतर सुद्धा त्याला कुठलीही वैद्यकीय सुविधा न देता व त्याला पगार न देता कामावरून कमी केल्या प्रकरणी जवळपास 10 कामगारांनी कपंनी विरोधात आवाज उठवला होता, मात्र कंपनीने त्या 10 कामगारांना सुद्धा कामावरून कमी केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्या नेतृत्वात मागील 6 फेब्रुवारी पासून कंपनी गेट समोर ठिय्या आंदोलन आहे, दरम्यान कंपनी प्रशासन कामगारांना कामावर घेण्यास तयार नसल्याने कामगारांनी कामबंद आंदोलन दिनांक 7 फेब्रुवारी पासून सुरु झाले आहे, दरम्यान कंपनी व्यवस्थापन यांच्या सोबत मनसे पदाधिकारी यांची झालेली बैठक ही निष्फळ ठरली असल्याने हे आंदोलन काल सायंकाळ पर्यंत सुरुचं होते. दरम्यान काल सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील कामगार अधिकारी फड हे आंदोलनाची दखल घेऊन कंपनीत गेले असता कंपनीतील परप्रांतीय कामगार दहा ते बारा फूट भिंती ओलांडून पळाले होते मात्र आंदोलन करणाऱ्या मराठी कामगारांनी त्यांना पकडले. त्या कमागारांची माहिती घेतली असता ते झारखंड यूपी बिहार यां राज्यातील असल्याचे त्यांनी सांगितले.

सनविजय अलॉय पॉवर कंपनीत जे कंत्राटदार आहेत त्यापैकी अनेकांची नोंदणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नसून त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कामगारांची संख्या जवळपास 200 च्या वर आहे, दरम्यान अशाच एका बेकायदेशीर कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदार यांच्या एका कामगारांचा अपघात झाला होता तरी सुद्धा त्याला कंत्राटदार किंव्हा कंपनी कडून वैद्यकीय खर्च दिला नाही तर उलट त्याला कामावरून काढून टाकल्या गेले, याकरिता जवळपास 22 कामगारांनी आवाज उठवला की त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे मात्र कंपनी ठेकेदारांनी उलट त्यापैकी 10 कामगारांना कामावरून काढून टाकले यावरून कंपनीच्या कंत्राटदारांकडून मनमानी कारभार असून कामगारावर अन्याय होतं आहे, त्यामुळे मनसे कामगार सेनेच्या पाठिंब्याने आंदोलन सुरु करण्यात आले होते.

यां कंपनीत जवळपास 350 ते 400 कामगार काम करीत आहे, त्यापैकी जवळपास 200 कामगार हे बाहेर प्रांतातील आहे, कंपनीत अनेक बोगस कंत्राटदार आहेत त्यांच्या कडे जे काम करतात त्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जमा होतं नाही आणि किमान वेतन कायाद्यानुसार त्यांना वेतन मिळतं नाही, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातून दरवर्षी कामगारांच्या वेतन धोरनानुसार किमान वेतन संबंधी आदेश निघतो मात्र यां कंपनीतील कामगारांना दरवर्षी वेतन वाढ होतं नाही, त्यांना वैद्यकीय सुविधा नाही, कंपनीत ऍम्ब्युलन्स आहे पण त्यात पेट्रोल डिझेल नाही, कामगारांना काही दुखापत झाली तर शासनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या ताडाळी येथे उपचार केल्या जातो, त्यामुळे यां कंपनीत कंपनी कायदा आणि कामगार कायाद्यानुसार काम सुरु नसल्याने मराठी कामगारांनी कंपनी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या झेंड्याखाली दिनांक 6/2/2025 पासून आंदोलन सुरु केले होते, दरम्यान यां आंदोलनाची धास्ती घेऊन कंपनी व्यवस्थापन आणि कामगार धास्तावले असल्याने काल जवळपास 21 परप्रांतीय कामगारांनी दहा ते बारा फूट भिंती ओलांडून पळ काढला होता, यावेळी मनसे कामगार जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहत्तुक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, उमाशंकर तिवारी, जनहीत जिल्हाध्यक्ष रमेश काळबाधे सुनील गुढे, रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, व्यापारी सेना जिल्हाध्यक्ष महेश शास्त्रकार अँड.अजीतकुमार पांडे मोहम्मद फयाज इत्यादीची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here