जनता महाविद्यालय, चंद्रपूर येथे 2024-2025 पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन
चंद्रपूर :- चांदा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जनता महाविद्यालय, चंद्रपूर येथे महोत्सव 2024-25 अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर मेकिंग स्पर्धेने एक खास आकर्षण निर्माण केले. या स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाच्या मानव्याविद्या विभागात संस्थेचे सचिव डॉ. अशोकभाऊ जिवतोडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
News reporter :- अतुल दिघाडे
स्पर्धेचे प्रमुख परीक्षक म्हणून प्रो. गीता पाटील, विभाग प्रमुख, इलेक्ट्रॉनिक्स, साई पॉलिटेक्निक, आणि सौ. सरोज बारदलकर, आर्ट अँड क्राफ्ट शिक्षक, CISCE, कार्मेल अकॅडमी, चंद्रपूर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विशेष पाहुणे म्हणून डॉ. एन. आर. बेग (IQAC समन्वयक), डॉ. आय. एस. कोंड्रा (सांस्कृतिक विभाग प्रमुख), डॉ. के. ए. वर्मा (कार्यक्रम संयोजक) आणि प्रा. अमर बलकी उपस्थित होते.
स्पर्धेचा विषय “मोबाइल फोन आ डिक्शन” ठेवण्यात आला होता. या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक कू. आचल खरवार आणि द्वितीय पारितोषिक कू. मानसी नहारकर यांना प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. अमर बलकी यांनी केले, तर आभार श्री. निर्दोष दहिवले यांनी मानले.
महाविद्यालयाच्या महोत्सवात अशा विविध रचनात्मक स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कलेला वाव देत आहेत, यामुळे महाविद्यालयात सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे.