बैंक ऑफ महाराष्ट्र चे झोनल अधिकाऱ्यांनी टेमुर्डा येथून वरोरा येथे बैंक स्थांनंतरण करण्याचा घाट घातल्याने खातेदार संतापले.
वरोरा /टेमुर्डा धनराज बाटबरवे :-
चंद्रपूर नागपूर महामार्गावरील टेमुर्डा येथे कित्येक वर्षांपासून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र बॅंकेच्या व्यवस्थापनाने सदर शाखा वरोरा येथे स्थरालांतरित करण्याचा जो निर्णय घेण्यात आला त्या विरोधात या परिसरतील खातेधारक संतापले असून जर हा निर्णय रद्द केला नाही तर 21 जुलै ला या परिसरातील हजारो खातेधारक टेमुर्डा हायवे वर चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा काल टेमुर्डा येथे झालेल्या खातेधाराकांच्या पत्रकार परिषदेत देण्यात आला. यावेळी टेमूर्डा येथील खातेधारकासह आटमुर्डी, बेलगांव, पिपळगाव, मोवाडा, आसाळा, भटाळा, खेमजई, पिजदुरा, पाजगाव, केम, ताळगावान, तळेगाव, जामणी, मांगली, उमरी, तुमगाव यासह एकूण चाळीस गावांचे खातेधारक उपस्थित होते.
टेमुर्डा येथील बैंक ऑफ महाराष्ट्र मध्ये तब्बल 10 हजारापेक्षा जास्त बैंक खातेदार असून विविध शासकीय योजनांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतात, शेतकरी योजनांचे पैसे, लाडकी बहीण योजनांचे पैसे व विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या योजनांच्या व्यवहाराचे पैसे या बॅंकेत येत असतें आणि ती बैंक जर इथून गेली तर खातेधाराकांना मोठी अडचण होईल त्यातच छोट्या व्यापाऱ्यांना सुद्धा त्रास सहन करावा लागेल त्यामुळे ही बैंक स्थानांतरण होऊ नये अशी या परिसरातील खातेधाराकांची मागणी आहें.
आनंदवन येथे बैंक नेण्याचं कुठलं धोरण?
मागील 25 वर्षांपासून ग्रामपंचायत इमारतीत असलेली बैंक शाखा केवळ 3 हजार रुपये भाडे ग्रामपंचायत ला देते आणि ग्रामपंचायत कडून सुविधा देतं नसल्याच्या बोंबा मारते पण बैंकेच्या एटीएम मध्ये चोरी होणे हा मुद्दा समोर करून ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना दोष देण्यापेक्षा बैंकेने सुरक्षा रक्षक ठेवावे आणि याबाबत स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी बैंकेच्या व्यवस्थापक यांना सुनावले होते, खरं तर ही शाखा आनंदवन शाखेत मर्ग करण्याचा आणि आनंदवन चौकमध्ये बैंकेचे सेंटर ठेवण्याचा जो निर्णय झोनल मॅनेजर यांनी घेतला तो चुकीचा आहें, त्यामुळे बैंक व्यवस्थापनाने ग्रामवासियांचा असंतोष बघता हा निर्णय रद्द करावा अन्यथा चक्का जाम करून मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा काल झालेल्या पत्रकार परिषदेतसर्व खातेधारक यांनी दिला आहें.
या पत्रकार परिषदेला टेमुर्डा येथील सरपंच सुचिता ठाकरे, उपसरपंच विमल वाटोळे, माजी सरपंच संगीता आगलावे, तंटामुत्की अध्यक्ष ज्ञानेश्वर वरवादे ,पोलीस पाटील नितेश वाटोळे, पोलीस पाटलीन शोभा चंदनबटवे, सुरेंद्र देठे, ग्रामपंचायत सदस्य भारती चंदनबटवे, बेबी टेकाम, तुळशीराम आगलावे, संगीता तिखट, मयुर वीरूटकर, फकीरचंद कोटांगळे, संजय घरत, दुर्गा आगलावे, जयश्री बोरेकर यांचेसह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.