Home महाराष्ट्र कोरोनाची एकीकडे भिती वाढली तर दुसरीकडे सुखद बातमी !

कोरोनाची एकीकडे भिती वाढली तर दुसरीकडे सुखद बातमी !

राज्यात कोरोना ग्रस्ताचा आकडा वाढला १०७ रुग्णांची नोंद, तर दुसरीकडे भारतात ३७ कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी परतणार ! 

कोरोना अपडेट : –

भारतामध्ये एकीकडे ३७ कोरोनाचे रुग्ण बरे होऊन आज घरी जाणार आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. कालपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या ९७ होती पण आता कोरोनाचे आणखी १० पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. पुण्यात 3 तर साताऱ्यामध्ये कोरोनाचा १ असे चार तर इतर ठिकाणी ६ नवे रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १०७ झाली आहे.त्यामुळे एकीकडे दुःखद बातमी तर दुसरीकडे सुखद बातमी आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०७ वर पोहोचल्यानं भीती आणि चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कर्फ्यू लागू केला आहे. जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार पसरला आहे. १५ हजारहून अधिक लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. हा व्हायरस आता वेगानं पसरत असल्याचं समोर आलं आहे. सोमवारी पंजाबमध्ये सर्वात पहिल्यांदा कर्फ्यू लावण्यात आला होता. महाराष्ट्रातील वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही कर्फ्यू लावला आहे.

कोरोना व्हायरस पश्चिम महाराष्ट्रात पसरला ! 

महाराष्ट्र सरकारने कोरोनाव्हायरसशी मुकाबला करण्यासाठी कडक निर्बंध लादले आहेत. संध्याकाळपासूनच राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण त्याबरोबरच या विषाणूचा प्रसार आता मोठ्या शहरांपासून महाराष्ट्राच्या निमशहरी आणि ग्रामीण भागात पसरत चालल्याचं उघड होत आहे. नव्या केसेसमुळे आता राज्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. यात  रुग्ण सांगली आणि साताऱ्यातील आहेत.

भारतातील 37 रुग्णांनी केली कोरोनावर मात! 

मिळालेल्या माहितीनुसार, ३७ कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी जाणार आहेत. तर मुंबईतही एक जोडपं कोरोनावर मात करून घरी जाणार आहेत. आज त्यांची अखेरची चाचणी करण्यात येणार आहे. खरंतर देशामध्ये कोरोनाचा वाढता फैलाव पाहता तात्काळ कठोर निर्णय घेण्यात आले. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी मदत होत आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे, यापैकी बहुतेकांना कोणत्याही औषधाची गरज नाही आहे. सध्या त्यांच्यावर सहाय्यक उपचार केले जात आहेत. भारतातील बहुते लोकांमध्ये सौम्य संसर्ग आहे. सध्या केवळ ५ टक्के लोकांना ICUमध्ये ठेवण्याची गरज आहे.

Previous articleधक्कादायक :-चीनमधे कोरोनाचा धोका आहे हे सांगणाऱ्या डॉ. ली यांचेच कोरोना आजाराने निधन !
Next articleघरात उपलब्ध साहित्यामध्ये सण साजरा करू या, यंदा कोरोनाला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारु या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here