Home वरोरा धक्कादायक :- पिंपळगाव गिट्टि खदाणीतील फ्लायऑशने खड्डे बूजवूण गौण खनिजचे अवैध उत्खनन...

धक्कादायक :- पिंपळगाव गिट्टि खदाणीतील फ्लायऑशने खड्डे बूजवूण गौण खनिजचे अवैध उत्खनन सुरू !

खनिकर्म अधिकारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ? शासनाच्या कोट्यावधी रुपयाच्या महसूलाची चोरी।

वरोरा प्रतिनिधी :-
चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा खनिकर्म अधिकारी गजानन कामडी हे गिट्टि क्रशर मालक व रेती तस्कर यांच्यासोबत संगनमत करून शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडवतात अशा तक्रारी वरून त्यांची अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्दुत वरखेडकर ह्या चौकशी करीत असल्याने अवैध रेती व अवैध गौण उत्खनन यांच्यासह गिट्टि क्रशर मालक चिंतेत असताना आता चक्क तालुक्यातील पिंपळगाव येथील गिट्टि खदाणीतून गोटे उत्खनन करुंण तिथे वर्धा पॉवर किंवा जीएमआर या कंपनी तील फ्लायऑशने खदान बूजविण्याचे काम एक गीतेश सातपुते नामक गिट्टि क्रशर मालक करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे, एकीकडे या पॉवर निर्मिती कंपन्या सिमेंट विटा करिता फ्लायऑश उपलब्ध करून देत नसतांना गिट्टि खदान बूजविण्यास कशी काय ते फ्लायऑश देत आहे ? हा गंभीर प्रश्न असून या खदाणीमधे शेकडो ट्रक फ्लायऑशचे टाकण्यात आल्याने याचे संपूर्ण मोजमाप केल्यास लाखो रुपयाची महसूल चोरी गिट्टि मालक, खनिकर्म अधिकारी यांच्या सोबत संगनमत करून बुडवित असल्याचे स्पष्ट होत आहे.
वरोरा तालुक्यातील पिंपळगाव येथे अनेक राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी यांचे गिट्टि क्रशर असून त्यापैकी गीतेश सातपुते यांच्या मालकीची एक गिट्टि क्रशर असून त्यांच्या खदाणीत अवैध पणे वर्धा पॉवर व जीएमआर या कंपन्यातून आलेली फ्लायऑश गिट्टि खदाणी मधे टाकून ती खदान बुजवीण्यात येत आहे. मात्र यामुळे गिट्टि खदाणी मधे कमी उत्खनन दाखवून लाखो रुपयाचा महसूल गिट्टि क्रशर मालक बुडवित असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता जिल्हा खनिकर्म अधिकारी व खनिकर्म निरीक्षक यांचे गीतेश सातपुते यांच्यासोबत साटेलोटे असल्याची पुष्टी होत आहे त्यामुळे या गिट्टि खदान मालक सातपुते यांच्यावर त्वरित गिट्टि खदान चे मोजमाप करून दंड आकारणी करावी व संबंधित खनिकर्म अधिकारी यांचेवर शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडविल्याने कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here