Home वरोरा सप्ताह :- कृषि संजीवनी सप्ताह निमित्य  कृषी विभागाचे आसाळा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

सप्ताह :- कृषि संजीवनी सप्ताह निमित्य  कृषी विभागाचे आसाळा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

गावातील प्रगतशील शेतकऱ्यांची उपस्थिती !

तालुका प्रतिनिधी किशोर डुकरे :- 

देशात आता कोरोना संक्रमण आणि त्यामुळे झालेले लॉक डाऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला कमजोर करणारी घटना असून जर देशाला या आर्थिक संकटातून बाहेर काढायचे असेल तर देशाच्या कृषी व्यवस्थेला बळकट करणे आवश्यक आहे मात्र शेतकऱ्यांचे शेतातील खत व्यवस्थापन आणि त्यामधे असलेल्या गवताचे योग्य नियोजन यामुळेच शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेची स्थिती लक्षात येते.

शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि शेतातील व्यवस्थापन यासंबंधी माहिती देण्यासाठी कृषी विभागाने कृषी सप्ताहाचे आयोजन  1 जुले ते 7 जुले या कालावधीत महाराष्ट्र सरकारच्या आदेशाने काल  पासून सुरु केले  आहे त्याचाच एक भाग म्हणून वरोरा तालुक्यातील आसाळा या गावी पहीला कार्यक्रमघेवून  तालुक्यात सुरुवात झाली

त्यावेळी कार्यक्रमाचे मार्गदर्शक कृषी पर्यवेक्षक  काळे , कृषी सहायक भुते,  कृषि मित्र डाखरे तसेच आसाळा या गावातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते, कोविड 19 चे नियमाचे पालन करण्यात आले आणि  पिकावरील खत व्यवस्थापन व पिकातील गवत यांचे नियोजन यावर चर्चा करण्यात आली.

Previous articleकेंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन!
Next articleसेवकाळातील अनुभवांचा नवोदित कामगारांना फायदा- खान प्रबंधक आर.के.आचार्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here