Home कोरपणा अंगणवाडी च्या वतीने पोषण अभियान हे जन आंदोलन म्हणून राबविल्या जाणार

अंगणवाडी च्या वतीने पोषण अभियान हे जन आंदोलन म्हणून राबविल्या जाणार

कोरपना येथे अभियानाला सुरवात,
(प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी)
कोरपना अंगणवाडी क्र १,२,३, च्या वतीने पोषण आहार जनआंदोलन म्हणून कार्यक्रम राबविला जात असून या कार्यक्रमाचे ८ सप्टेंबर ला अंगणवाडी येथे उदघाटन करण्यात आले आहे,
या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेविका सौ संगीता पंधरे यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी उदघाटन भाषणात बोलत असतांनी त्या म्हणाल्या की, प्रत्येक मातेचे बाळ निरोगी व सुदृढ राहावे या करिता पोषण आहार गरजेचे आहे त्यामुळे प्रत्येक मातेने आपल्या बाळाला योग्य पोषण आहार द्यावे जनेकरून बाळ सुदृढ राहतील, त्यामुळे अंगणवाडी सेविकेसोबतच मातेची सुद्धा जवाबदारी आहे, असे प्रतिपादन नगरसेविका संगीत पंधरे यांनी केलेही हेअभियान जण आंदोलन म्हणून राबविणार येणार असून प्रत्येकाच्या घरी गृहभेट देऊन लहान मुलांची उंची, वजन,मोजले जाणार आहे, सदर अभियान महिनाभर सुरू राहणार असून पोषण आहाराचे महत्व पटवून दिले जाणार आहे, या अभियानाची माहिती अंगणवाडी सेविका ज्योती तुमराम, गुजाबाई डोंगे, वनिता पालीवाल यांनी महत्व पटवून दिले, यावेडी अंगणवाडी प्रवेशिका वेलादी मॅडम उपस्थित होत्या

Previous articleकन्हाळगाव अंगणवाडी क्रमांक दोन मध्ये पोशन अभियान जन आदोंलन कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न
Next articleविष्णू कष्टी यांची हत्त्या करणाऱ्या परप्रांतीय शंभू चौधरी याला त्वरित अटक करा- मनसेचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here