News Now
Home > वरोरा > विष्णू कष्टी यांची हत्त्या करणाऱ्या परप्रांतीय शंभू चौधरी याला त्वरित अटक करा- मनसेचा इशारा

विष्णू कष्टी यांची हत्त्या करणाऱ्या परप्रांतीय शंभू चौधरी याला त्वरित अटक करा- मनसेचा इशारा

 

मराठी माणसावर परप्रांतीयांची दादागिरी चालू देणार नाही, मनसेचे उपविभागीय पोलीस अधिकारी पांडे यांना निवेदन. 

वरोरा प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कंत्राटदार व कामगार आले व येथे दादागिरी दाखवून स्थानिक मराठी माणसाचा हक्काचा रोजगार हिरावला आहे. त्यातच आता मराठी माणसावर परप्रांतीयांचे हल्ले व्हायला लागले असून आता तर ते मराठी माणसाचा खून पण करायला लागले आहे, त्यातच वरोरा तालुक्यातील खांबाडा येथील ३६ वर्षीय विष्णू कष्टी यांचा खून करून फरार झालेला शंभू चौधरी याचा शोध पोलीस घेऊ शकले नसल्याने संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शंभू चौधरी याला त्वरित अटक करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी पांडे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

मूळचा राजस्थानी असलेल्या शंभू चौधरी याचे गिट्टि क्रशर वर ब्लॉष्टीगचे मोठे काम असून तो याकरिता बेकायदेशीर विस्फोटक पदार्थ वापरून लाखोंची कमाई करतो आणि येथे सर्व राजकीय व पत्रकार यांना मैनेज करून दादागिरी करतो त्या दादागिरीतूनच त्याने विष्णू कष्टी चा खून केला आहे. आपल्या बेकायदेशीर बांधकाम केलेल्या गोडाऊन मधे विस्फोटक पदार्थ असल्यामुळे त्याचे सरक्षण व्हावे म्हणून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी जवळीक केलेल्या शंभू चे कारनामे हे स्थानिक लोकांवर अन्याय अत्याचार करणारे असून त्याला पोलिसांनी त्वरित अटक करावी व त्याच्या गोडाऊन मधील विस्फोटक जप्त करून त्याचे गोडाऊन सील करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्थानिक नागरिकांना घेवून मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देऊन दिला आहे. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, वरोरा तालुका अध्यक्ष वैभव डहाणे, शहर उपाध्यक्ष मोहसीण सय्यद, शरद मडावी, जाकीर शेख इत्यादींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Top