पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, मुख्य आरोपी शंभू चौधरी अजूनही फरार, पोलिसांनीच त्या आरोपींना फरार केल्याची गावकऱ्यांमधे चर्चा ?
वरोरा प्रतिनिधी :-
तालुक्यातील चर्चीत विष्णू कष्टी खून प्रकरण तापत असताना व मुख्य आरोपी शंभू चौधरी याला पोलिसांनीच फरार केल्याची चर्चा खांबाडा गाव शिवारात घडत असताना आता त्या खून प्रकरणातील अटक झालेल्या दोन आरोपी पैकी एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
खांबाडा गावालगत असलेल्या गोडाऊन मधे विस्फोटक पदार्थ साठवून बेकायदेशीर ब्लास्ट्टिगचे काम करणारे शंभू चौधरी यांनी त्याच्याकडे कधी काळी ड्रायवर म्हणून काम करणाऱ्या विष्णू कष्टी याचा आपल्या साथीदारांना घेवून खून केल्याची मोठी घटना घडली असताना व दोन आरोपी पकडल्या नंतर मुख्य आरोपी शंभू चौधरी हा फरार होतो कसा ? हा प्रश्न गावातील लोक पोलिस प्रशासनाला विचारत असून पोलिसांसोबत असलेल्या त्यांच्या समंधामुळेच पोलिसांनी त्याला फरार केल्याची चर्चा खांबाडा गाव शिवारात होत असताना आता या खून प्रकरणातील पकडलेल्या आरोपी पैकी एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची खळबळजनक माहिती असल्याने वरोरा पोलीस स्टेशन चे किती पोलिस कर्मचारी आरोपीच्या संपर्कात आले व दुसरा आरोपी यासह मुख्य आरोपी शंभू चौधरी पण कोरोना पॉझिटिव्ह असेल का ? व या सर्वाना कोविड सेंटर वर ठेवणार का ? या अशा विविध चर्चा वरोरा येथे घडताना दिसत आहे.