Home वरोरा धक्कादायक :- वर्धा नदी वडकेश्वर घाटावर अवैध रेती उत्खनन केलेल्या खड्ड्यात गुराखी...

धक्कादायक :- वर्धा नदी वडकेश्वर घाटावर अवैध रेती उत्खनन केलेल्या खड्ड्यात गुराखी दिनेश किन्नाके यांचा बुडून मृत्यू.

 

अवैध रेती उत्खनन करणाऱ्या रेती चोर व महसूल विभागाच्या कर्मचारी अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मृतकाच्या  पत्नीची मागणी.

वरोरा प्रतिनिधी :-

तालुक्यात आमडी -बोरी च्या वडकेश्वर घाटावर मोठ्या प्रमाणात अवैध रेती वर्धा नदीच्या पत्रातून मागील अनेक महिन्यापासून सुरू असून नदी तून वाळू उपसा करताना मोठ मोठे खड्डे पडले आहे आणि विशेष म्हणजे नदीतून बोटीद्वारे वाळूचा उपसा करीत असल्याने नदी पात्रात पाणी असताना सुद्धा रेतीचा उपसा सुरू आहे, शिवाय इथे दोन पोकलैण मशीनचा सुद्धा वापर केल्या जात असल्यामुळे नदी पात्रातील पाण्याचा अंदाज नसल्यानेच दिनेश किनाक्के ह्या गूराख्याचा गाईला पाण्यातून काढण्याच्या नादात त्याचा काल दिनांक १३ सप्टेंबर ला दुपारी ३ च्या दरम्यान बुडून अंत झाला.

ह्या रेती घाटावर निखिल सरोदे, सुशांत नांदेकर, राहुल इंगोले, राजू पोले, इत्यादी रेती तस्कर पौकलैण मशीन व बोटीने वाळू उपसा करून मोठे खड्डे करीत आहे व त्यांच्यामुळेच माझ्या पतीचा मृत्यू झाला असल्याने वरील रेती तस्कर व महसूल विभागाच्या कर्मचारी अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व रेती चोरांचे बोटीसह मशीन व हायवा ट्रक जप्त करण्यात यावे अशी मागणी मृतकाच्या पत्नी शीतल दिनेश किनाक्के यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार,जिल्हा पोलिस अधीक्षक व ठाणेदार यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे. जोपर्यंत वरील रेती तस्करावर व महसूल अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही व मृतकाच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत मृतकाचा मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही असा इशारा सुद्धा मृतकाच्या पत्नीने प्रशासनाला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here