प्रमोद गिरटकर कोरपना
शहराच्या ठिकाणी कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून आता कोरोणाणे ग्रामीण भागातीही शिरकाव केला आहे.कोरपणा तालुक्यातील अंतरगाव बु या गावामध्ये कोरोणाणे शिरकाव केला आहे.मागील तीन दिवसात कोरोना पाझिटिव रुग्णाची संख्या 11 वर पोहचली आहे.गावामध्ये कोरोना संसर्ग वाढतच दिसत आहे.
अंतरगाव बु मध्ये सामुहिक सण्सर्गाची लक्षणे दिसत असल्याने कोरोनाचा अंतरगाव मध्ये केव्हाही उद्रेक होऊ शकतो.त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी ग्राम पंचायत अंतरगाव बु ने 15 सप्टेंबर मंगळवार ते 17 सप्टेंबर गुरुवार पर्यंत जनता जनता कर्फ्यू चे आव्हान केले आहे.
ग्राम पंचायत अंतरगाव बु चे सरपंच.सरिताताई पोडे ग्राम सचिव प्रशांत टाटेवार आरोग्य परीचालीका ढवस म्याडम पोलिस पटिल आनंदराव मडावी यांच्या मार्गदर्शणाखाली काल रविवारला पार पडलेल्या बैठकीत व्यापारी तथा प्रतिष्ठित नागरिक यांच्या सहमतीने जनता कर्फ्यू चा निर्णय घेण्यात आला.या बैठकीला उपस्थित अंतरगावचे सरपंच सरिता नितीन पोडे उपसरपंच श्यामकलाताई पिंपळशेंडे ग्राम पंचायत सदस्य ग्राम पंचायत सचिव प्रशांत टाटेवर पोलिस पटिल आनंदराव मडावी तंटा मुक्ती अध्यक्ष सुरेश कळसकर आरोग्य परीचालीका ढवस म्याडम झाडे म्याडम माजी उपसरपंच आशीष मुसळे बंडू वडस्कर बाळा वड्स्कर बंडू खेलूरकर गजानन मोरे
प्रतिष्ठित व्यापारी रविकांत गजानन बोबडे मंगेश वड्स्कर संतोष पिंपळकर व युथ एमर्जण्सी सर्विस चे अध्यक्ष अमोल कळसकर व त्यांची संपूर्ण टीम उपस्थिती होती
तीन दिवस संपूर्ण प्रतिष्ठाने बंद राहतील
बाहेरगावी जाण्यास व बाहेर गाववरून गावात येण्यास तीन दिवसा करिता मनाई केली आहे
अंतरगाव येथील नागरिकांनी या जनता कर्फ्यूला सहकार्य करावे असे आव्हान ग्राम पंचायत प्रशासनाने केले आहे