Home कोरपणा धक्कादायक :- गडचांदूर ठाणेदार गोपाल भारतीची अवैध धंदेवाईक यांच्याशी साठगांठ?

धक्कादायक :- गडचांदूर ठाणेदार गोपाल भारतीची अवैध धंदेवाईक यांच्याशी साठगांठ?

 

चंद्रपूर वरून एलसीबी पोलीस पथक कारवाई करतात गडचांदूरात, तिथेही ठाणेदाराची धन उगाई जोरात?

पोलीस पंचनामा भाग – १

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर जर सर्वात मोठा आर्थिक लाभ झाला असेल तर तो निश्चितच पोलिस प्रशासनातील भ्रष्ट पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना झाला, त्यातच गडचांदूर हे औद्धौगिक शहर असल्याने इथे दारू मोठ्या प्रमाणात पिल्या जाते व इथे आंध्र प्रदेश सीमा व यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुका लागून असल्याने या भागातून मोठ्या प्रमाणात अवैध दारू या भागात दारू तस्कर आणत असतात, खरं तर पोलिसांनी मनात ठाणल तर कुठलाही दारू तस्कर हा अवैध दारू विक्री करू शकत नाही पण पोलिसांचा आर्थिक छुप्या पाठिंबा आणि त्यातच गोपाल भारती सारखे भ्रष्ट पोलीस अधिकारी व त्यांची  दारू तस्करा सोबत असलेली साठगांठ यामुळेच एक प्रकारच पाठबळ  दारू तस्करांना मिळत असल्याने अवैध दारू विक्री गडचांदूर परिसरात खुलेआम होत आहे.

ठाणेदार गोपाल भारती यांच्या भ्रष्ट कारनाम्याच्या अनेक चुरस कथा येणाऱ्या भागात वाचायला मिळतीलच, पण विशेष म्हणजे ठाणेदार गोपाल भारती हे अवैध दारू तस्कर यांच्याकडून हप्ते तर घेतातच शिवाय स्वतः दारू तस्करांना न पकडता चंद्रपूर वरून एलसीबी पथक जेंव्हा त्यांच्या गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीत दारू पकडतात त्यांच्या कारवाई मधे सुद्धा हप्ते देणाऱ्या दारू तस्कराकडून हे ठाणेदार अटकेच्या नावाखाली पैसे घेतात अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. या भागात अवैध दारू विक्रीसह, सट्टापट्टी, जुगार, आणि सुगंधीत तंबाखूची खुलेआम अवैध विक्री यापासून महिन्याकाठी ठाणेदार यांच्याकडे पाच ते दहा लाखांची हप्ता वसुली होत असल्याची चर्चा आहे, ठाणेदार गोपाल भारती एकीकडे गावातील प्रतिष्ठित नागरिक व लोकप्रतिनिधी यांना चांगली वागणूक देत नाही तर उलट अवैध दारू तस्करांचा ते सन्मान करतात व त्यांच्या सन्मानार्थ पोलीस कर्मचाऱ्यांना पाणी आणि चहा ठाणेदार साहेबांच्या कैबिन मधे पोहचवा लागतो म्हणजे हे पोलीस विभागाचे दुर्भाग्य म्हणावे लागेल. त्यामुळे ठाणेदार गोपाल भारती यांच्या माध्यमातून ” सदरक्षणाय खलनिग्रहनाय” या पोलीस ब्रीद वाक्याला तिलांजली दिल्या जात असल्याने त्यांच्या संपूर्ण कार्यकाळातील झालेल्या अवैध धंदेवाईक यांच्यावरील कार्यवाहीची विभागीय चौकशी करावी व अशा भ्रष्ट पोलीस अधिकारी यांना या परिसरातून तात्काळ हटविण्यात यावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

पुढील भागात वाचा गडचांदूर परिसरातील ते दारू तस्कर कोण? व त्यांचे ठाणेदार यांच्यासोबत असलेले  अर्थपूर्ण सबंध.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here