Home महाराष्ट्र शाळेच्या फी संदर्भात आधी हात जोडून तरीही सरकारने नाय ऐकलं तर हाथ...

शाळेच्या फी संदर्भात आधी हात जोडून तरीही सरकारने नाय ऐकलं तर हाथ सोडून” – राजसाहेबांचं पालकांना आश्वासन!

मराठी माणसाचं हक्काचं न्यायालय बनलय राजसाहेबांचं कृष्णकुंज!

राजमार्ग :-

फी वाढ विरोध आणि रखडलेली ११ वी प्रवेशप्रक्रिया संदर्भात पालकांनी तसेच पालक संघ आणि कोचिंग क्लासेसचे मालक आणि शिक्षकांच्या शिष्टमंडळाने आज कृष्णकुंजवर राजसाहेबांची भेट घेतली. “आधी हात जोडून तरीही सरकारने नाय ऐकलं तर हाथ सोडून” – राजसाहेबांचं पालकांना आश्वासन!

ह्यावेळी साहेबानी त्वरित शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली, ह्यावर शिक्षण मंत्र्यानी राजसाहेबांना दोन दिवसात निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आहे.

शाळांची वाढीव फी –

रायन इंटरनॅशनल आणि बिलाबॉंग हाय इंटरनॅशनल स्कुल या दोन शाळांच्या पालकांनीही राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि वाढीव फी संदर्भातील त्यांची तक्रार मांडली. शाळा ट्युशन फीसोबत इतरही अतिरिक्त शुल्क आकारत आहेत, ते शुल्क करोना संकटकाळाचा विचार करता माफ होणे गरजेचं असल्याचंही पालकांनी राजसाहेब ठाकरे यांना सांगितलं.

नर्सरी फी –

ए पी जे अब्दुल कलाम मेमोरियल (S I E S Highschool), घाटकोपर येथील नर्सरीसाठी पालकांनी ५३,००० रुपये फी भरली. प्रत्यक्षात एकदाही शाळा भरली नाही. ३/४ वर्षाच्या लहान मुलांना ऑनलाईन शिक्षण दिलं जात आहे. त्यांना नेमकं काय शिकवलं जात आहे?
या वर्षासाठी (२०१९-२०) भरलेली फी पुढच्या शैक्षणिक वर्षात (२०२०-२१) समायोजित / adjust करून घ्यावी, यासाठी आपण हस्तक्षेप करावा, अशी मागणी पालकांनी राजसाहेब ठाकरे यांच्याकडे केली.

कोचिंग क्लासेस

लॉकडाऊननंतर आता सर्वकाही सुरळीत सुरू झालेले असताना कोचिंग क्लासेस बंद का? फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून १ नोव्हेंबरपासून कोचिंग क्लासेस सुरू करायला परवानगी द्यावी, अन्यथा, पालकांचे संमतीपत्र घेऊन एकाच दिवशी सर्व कोचिंग क्लासेस सुरू करू, असा इशारा कोचिंग क्लासेस असोसिएशन, महाराष्ट्र यांनी दिला आहे. यासंदर्भात पुण्याहून आलेल्या कोचिंग क्लासेस संचालकांनी राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली.

आयटीआय

आयटीआयमधील तासिका तत्त्वावरील अनुभवी तासिका निदेशकांना कंत्राटी पद्धतीने सामावून घेण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य आय टी आय निदेशक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि न्याय मिळवून देण्याची विनंती केली.

याप्रसंगी मनसे नेते बाळा नांदगावकर, अभिजित पानसे, शालिनी ठाकरे, अजय शिंदे, सुधाकर तांबोळी, सतीश नारकर, गणेश चुक्कल, अखिल चित्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleप्रेमाचा पंचनामा :- त्या महिलेचा प्रियकरांकडून खून करण्याचे रहस्य झाले उघड ?
Next articleलक्षवेधी :- चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी खरंच हटणार की केवळ फार्स ठरणार ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here