Home ब्रम्हपुरी खळबळजनक :- कुर्झा वार्ड ब्रम्हपुरी येथे गौण खनिज माफियांची वाढती दादागिरी.

खळबळजनक :- कुर्झा वार्ड ब्रम्हपुरी येथे गौण खनिज माफियांची वाढती दादागिरी.

स्थानिक प्रशासनाचा आशीर्वाद असल्याने शासनाच्या महसुलाची चोरी.

ब्रम्हपुरी प्रतिनिधी :-

अऱ्हेर नवरगाव रेती घाटावर रात्रो रात्रो रेतीच्या उत्खननाचे व डम्पिंग चे कामावर कुर्झा येथील एस्क्यावेटर व ट्रॅक्टर चालू असतात परंतु मागील दोन दिवसापासून काम बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील एस्क्यावेटर च्या साहाय्याने माती खोदून रात्री 8च्या नंतर ट्रॅक्टर च्या साहाय्याने प्लॉट च्या भरणा करिता वाहतूक धुमाळ चालू करण्यात आलेली आहे.

अश्याच प्रकारे दिनांक 16/12/2020 रोजी रात्री 8.00 वाजतापासून विशाल रमेश विखार, कुर्झा याचे एस्क्यावेटर च्या साहाय्याने मौजा कुर्झा येथील गट नंबर 514 मातीचे उत्खनन करून गट नंबर 500 श्रीमती मालतीबाई माहोरे याच्या शेताचे उभे धुरे फोडून उभ्या पिकांमधुन 7-8 ट्रॅक्टर च्या साहाय्याने कुर्झा विद्यानगर येथील संजय बावनकुळे यांच्या प्लॉट वर भरन टाकणे चालू केले ही बाब श्री सुभाष माहोरे यांच्या लक्षात येताच त्यांनी रात्री 11.00वाजता शेतावर जाऊन पहिले तर ट्रॅक्टर ने मातीची वाहतूक चालू होती लगेच तहसिलदार श्री विजय पवार यांना कॉल केला परंतु त्यांनी रिसिव्ह केला नाही तोपर्यंत ट्रॅक्टर व एस्क्यावेटर मालक ट्रॅक्टर व एस्क्यावेटर सह पडून जाण्यात यशस्वी झाले. त्यामुळे तहसीलदार, उपविभाग अधिकारी व जिल्हाधिकारी यांचे कडे लेखी तक्रार केली. कुर्झा वार्ड येथे रात्री रात्री रेती मातीचे उत्खनन व वाहतुकीमुळे लोकांची झोपमोड होते व उडणाऱ्या धुरामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे या रेती- माती माफियाच्या दादागिरीला कुण्या तरी राजकीय व्यक्तीचे पाठबळ असल्याची जनमानसात चर्चा चालू आहे. त्यामुळे सदर तक्रारींवर प्रशासन काय कारवाई करते या कडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here