Home Breaking News चिंताजनक :- ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा भोंगळ कारभार?

चिंताजनक :- ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा भोंगळ कारभार?

 

व्यापाऱ्यांशी साठगांठ? शेतकऱ्यांचे सातबारा गहाळ?

ब्रम्हपुरी प्रतिनिधी :-

शेतकऱ्यांना महामंडळला शासनाच्या हमी भावाने धान्य विक्री करण्यात करिता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने टोकन करिता ब्रम्हपूरी तालुक्यातील शेतकऱ्यांना 7/12 मागण्यात आले व ते सर्व सात बारा जमा करून तुमच्या नंबर लागल्या नंतर तुम्हाला कॉल करण्यात येईल असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले परंतु आता बाजारसमितीत शेतकऱ्याचे सातबारा मागच्या पुढे होऊन कित्येक शेतकऱ्यांचे सातबारा गहाळ झालेले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, या वर्षी धान पिकावर आलेल्या रोगामुळे व अचानक उध्दभवलेल्या कृत्रिम पूर परिस्थिती मुळे धान उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन 700रु बोनस जाहीर केले त्यामुळे जे काही उत्पन्न पदरी पडले त्यामधून दोन पैसे पदरी पडण्याच्या दृष्टीने शेतकरी व्यापाऱ्यांना माल न देता शासकीय धान विक्री केंद्रावर धान विकण्यासाठी धावपळ करीत आहे. शासकीय विक्री केंद्रावर धान विकण्यासाठी बाजार समिती मधून टोकन काढण्यासाठी 17 तारखेपासून बाजारसमिती ब्रह्मपुरीने सात बारा गोळा केले व शेतकऱ्यांना प्रत्येक सातबारा वर त्यांचे मोबाईल नंबर टाकण्यास सांगून तुमचा नंबर लागल्या नंतर तुम्हाला कॉल केल्या जाईल व सांगितलेल्या तारखेला व ठिकाणी तुम्हाला माल न्यावे लागेल असे सांगण्यात आहे, परंतु कित्तेक लोकांचे पहिले दिलेले सातबारा मागे ठेऊन मर्जीतील लोकांचे सातबारा पुढे करून धान काटा करने चालू केले हा प्रकार शेतकऱ्याच्या लक्षात येताj काही शेतकरी थेट बाजारसमितीत जाब विचारण्यासाठी गेले असता शेतकऱ्याचे सर्व सातबाराचे गट्ठे बाहेर टाकून दिले त्यामुळे कित्तेक शेतकऱ्याचे सातबारा गाहड झाले. नापिकी व कर्जबाजारी मुळे शेतकरी हवालदिल होऊन व्यापाऱ्यास कसा माल विकेल व तो माल व्यापाऱ्या कडून महामंडळा कडे विक्रीस येऊन आपले किसे कसे भरून घेता येईल हा बाजारसमिती कर्मचारी, ग्रेडर याचा षंडयंत्र असल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.

Previous articleदखलपात्र :- अडोरे कंपनी संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, शिवसेना नेते बंडू हजारे यांची मागणी,
Next articleखळबळजनक :- कुर्झा वार्ड ब्रम्हपुरी येथे गौण खनिज माफियांची वाढती दादागिरी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here