Home महाराष्ट्र आरोग्य वार्ता :- कोरोना लस कुणाला मिळणार ? आणि केंव्हा मिळणार ?

आरोग्य वार्ता :- कोरोना लस कुणाला मिळणार ? आणि केंव्हा मिळणार ?

 

फायझरच्या लशीचा युकेत वापर सुरू, 90 वर्षांच्या आजींनी घेतली पहिली लस ऑक्सफर्डची लस 70 टक्के परिणामकारक असल्याचा दावा.

कोरोना वार्ता :-

राज्यातील कोरोना लसीकरणासाठी मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सुकाणू समितीची पहिली बैठक झाली असून राज्यात कोरोना लसीकरणासाठी सुरू असलेल्या पूर्वतयारीचा आढावा मुख्य सचिवांनी घेतला.

कोरोनावर फायझरच्या लशीचा युकेत वापर सुरू झाला असून 90 वर्षांच्या आजींनी पहीली लस घेतली आहे आणि ऑक्सफर्डची लस 70 टक्के परिणामकारक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

राज्यस्तरीय सुकाणू समितीनंतर राज्य कृती दल, राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हास्तरावर जिल्हा कृती दल, जिल्हा नियंत्रण कक्ष, तालुकास्तरावर तालुका कृती दल आणि तालुका नियंत्रण कक्ष अशी यंत्रणा आहे.कोरोना च्या लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला असून पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखान्यातील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आले आहे.

दुसऱ्या गटात फ्रंटलाईन वर्करचा समावेश असून त्यामध्ये राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधील कर्मचाऱ्यांसह आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांचा आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या गटात 50 वर्षावरील आणि ज्यांना अन्य व्याधी आहेत अशा 50 वर्षाखालील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.

लसीकरणासाठी राज्य शासनाने तयारी केली असून आतापर्यंत शासकीय आरोग्य संस्थेतील 99 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा पूर्ण करण्यात आला आहे. तर खासगी आरोग्य संस्थेतील कर्मचाऱ्यांचा डेटा 78 टक्के पूर्ण झाला आहे.लस टोचण्यासाठी 16 हजार 245 कर्मचाऱ्यांची को-विन पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. आतापर्यंत को-विन पोर्टलवर 90 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. सुमारे दोन लाख 60 हजार शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे.

लसीकरण पथकामध्ये पाच सदस्यांचा समावेश असेल. राज्यात शीतगृहांची उपलब्धता असून राज्यस्तरीय एक, विभागीय स्तरावर नऊ, जिल्हास्तरावर 34, महामंडळांचे 27 अशी शीतगृह तयार असून 3 हजार 135 साखळी केंद्र उपलब्ध आहेत.कोरोना लसीकरणामुळे राज्यातील नियमित लसीकरण मोहिमेला बाधा येणार नाही याची खबरदारी घेण्यात आली असून कोरोनाच्या लसीकरण मोहिमेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत आहे. निवडणूक मतदान प्रक्रियेच्या धर्तीवर लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Previous articleसनसनिखेज:- वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड व रामटेके यांच्यावर रेती प्रकरणी गुन्हा दाखल ?
Next articleसनसनिखेज:- आठवलेची आपल्या सवयीप्रमाणे पुन्हा एकदा औरंगाबाद नामांतर मुद्द्यावरून राजकीय लाचारी आली समोर?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here