Home वरोरा सनसनिखेज:- वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड व रामटेके यांच्यावर रेती प्रकरणी गुन्हा दाखल ?

सनसनिखेज:- वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड व रामटेके यांच्यावर रेती प्रकरणी गुन्हा दाखल ?

 

मनसेच्या आंदोलनाचा धसका घेत पकडलेल्या अवैध रेती ट्रक्टर मालकांना मनसे तालुका अध्यक्ष विरोधात भडकविण्याचा राठोड यांचा प्रयत्न?

वरोरा प्रतिनिधी :-

तालुक्यातील वनविभागाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बंधारे व नाले यामधून अवैध रेती उत्खनन होत असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष यांनी वनविभाग, महसूल विभाग व पोलीस विभागाला निवेदने देवून अवैध रेती तस्करी थांबविण्याची मागणी केली होती. पण महसूल विभागाने कडेकोट बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केल्यानंतर वनविभागाच्या वणपरिक्षेत्र अधिकारी राठोड व रामटेके यांनी मात्र मोठ्या रेती तस्करांना मुभा देवून छोट्या ट्रक्टर चालकांची रेती चोरी पकडण्याचा सपाटा लावला व त्यांचे रेतीचे ट्रक्टर जप्त केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका अशी होती की जर छोट्या रेती तस्करी करणाऱ्या ट्रक्टर चालकांना पकडता तर मग मोठ्या रेती तस्करांना सूट का मिळते ? आणि जर त्या मोठ्या रेती तस्करांना पकडले नाही तर मनसे तर्फे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा वनविभागाला देण्यात आला होता, त्यामुळे  वनविभागाने रेती तस्करावर कारवाई करण्याचा सपाटा लावला खरा पण मनसेच्या आक्रमक भूमिकेला मवाळ कसे करायचे ? याची क्लुप्ती शोधून वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांनी शेगाव सर्कल मधे पकडलेला रेती ट्रक्टर चालकाला असा सल्ला दिला की “जर मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे म्हणत असेल तर मी आत्ताच ट्रक्टर सोडून देतो त्यांना मला फोन करायला लावा” त्यामुळे ट्रक्टर मालक सूरज खंगार यांनी वैभव डहाणे यांना रात्रीच्या जवळपास ११.३० वाजता फोन केला, पण त्यांचा फोन सायलेंट मोड मधे असल्यामुळे त्यांनी सकाळी फोन केला तेंव्हा मला राठोड साहेबांनी फोन करायला लावला असल्याची बाब खंगार यांनी उघड केली. दरम्यान राठोड हे जाणीवपूर्वक रेती चोरट्यांना माझ्या विरोधात आक्रोश निर्माण करताहेत त्यामुळे माझ्या जीवाला यांच्यापासून धोका आहे त्यामुळे वणपरिक्षेत्र अधिकारी राठोड व रामटेके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार वरोरा पोलीस स्टेशन मधे वैभव डहाणे यांनी दिली, सोबतच फोनवर झालेल्या संभाषणाची ऑडियो रेकॉर्डिंग पुरावा म्हणून दिल्याने राठोड व रामटेके यांच्यावर भांदवी कलम ५०७ अंतर्गत वरोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.आता या संदर्भात पोलीस काय कारवाई करतात? हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Previous articleधक्कादायक :- औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करा ही मनसेची मागणी शिवसेनेला घातक ठरतेय?
Next articleआरोग्य वार्ता :- कोरोना लस कुणाला मिळणार ? आणि केंव्हा मिळणार ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here