Home वरोरा मनसे तालुका अध्यक्षांना बदनाम करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड व रामटेके यांच्या चौकशीचे...

मनसे तालुका अध्यक्षांना बदनाम करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड व रामटेके यांच्या चौकशीचे आदेश

 

वरोरा पोलीस स्टेशन येथे मनसे तालुका अध्यक्ष यांच्या तक्रारी वरून राठोड व रामटेके यांच्यावर गुन्हा दाखल.

वरोरा प्रतिनिधी :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांच्या नेत्रुत्वात रेती तस्कर यांच्या विरोधात मोहीम राबवली गेली होती, मात्र वन विभागातील नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरूच होती त्यामुळे ही रेती तस्करी थांबली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठे आंदोलन करेल असा इशारा वन विभागाला देण्यात आला होता त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड व त्यांचे सहाय्यक रामटेके यांनी छोट्या ट्रक्टर चालकांची अवैध रेती वाहतूक अडवली व रेती भरलेले ट्रॅक्टर पकडल्यानंतर तुम्ही मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांना फोन करा जर त्यांनी सोड म्हटले तर मी ट्रक्टर सोडतो अशा प्रकारचे संभाषण पकडलेल्या रेती ट्रक्टर चालक यांच्या सोबत झाल्याने मनसे तालुका अध्यक्ष यांना रेती तस्कर यांचा फोन आला व त्यांनी ही माहिती दिली त्यामुळे संतप्त झालेल्या मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांनी वरोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करून वरोऱ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड व वनपाल विजय रामटेके हे रेती तस्कर यांना माझ्या विरोधात भडकवून मला जीवे मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो त्यामूळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली होती त्यामुळे राठोड व रामटेके यांच्या यांच्याविरोधात वरोरा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, संबंधित मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांनी विभागीय वनाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात निवेदन दिले होते व आरएफओ राठोड आणि वनपाल रामटेके यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली होती त्यामुळे साहाय्यक वनसंरक्षक एस. एल. लखमावाड यांना विभागीय वन अधिकारी जगताप यांनी राठोड व रामटेके यांच्या चौकशीचे आदेश दिले असून पाच दिवसात अहवाल सादर करावा असे आदेशात नमूद केले आहे.

वरोरा येथे येण्यापूर्वी वणपरिक्षेत्र अधिकारी राठोड हे सावली बफर झोन मधे कार्यरत होते त्या ठिकाणी सुद्धा त्यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरली होती त्याचीच री ओढत आता वरोरा येथे सुद्धा रेती माफिया सोबत साठगांठ करून शासनाच्या लाखो रुपयाच्या रेती व गौण खनिज चोरी प्रकरणात भ्रष्टाचार ते करीत असल्यामुळे आता या चौकशीत आरएफओ राठोड आणि वनपाल रामटेके यांच्यावर निलंबनाची कारवाई होते की त्यातून ते सुटतील हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Previous articleसनसनिखेज:- मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची झेड सुरक्षा काढण्याचे कारण काय ?
Next articleधक्कादायक :- सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुद्धा दिल्लीतील शेतकरी आंदोलन सुरूच,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here