Home वरोरा चिंताजनक ;- खाबांडा येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी पाण्याविणा तहानलेलेच.

चिंताजनक ;- खाबांडा येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी पाण्याविणा तहानलेलेच.

 

शाळेच्या दूराव्यवस्थेला जबाबदार कोण?

भूमिपुत्र वृत्तसेवा खाबांडा
मनोहर खिरटकर.

कोरोना महामारीने संपुर्ण देश ढवळून निघाल्यामुळे अर्थचक्र थांबले. शाळा, व्यापार, छोटिमोठी दुकाने बंद पडली आणि यामधे वर्ष संपले आता महामारीचा प्रकोप थोडा कमी होताच सर्व बंधने झटकून शाळेचे सत्र सुरू झाले हळुहळू काही वर्गही सुरू करण्यात आले .अशातच खाबांडा येथील जिल्हा परिषद शाळेतील वर्ग ५ वी ते ७ वी पर्यत वर्ग सुरु करण्यात आले खरे, पण या शाळेत सुविधाचा अभाव असल्याने शाळेतील मुख्यध्यापकांना पालकांतर्फे सुचना करण्यात आल्या परंतु सूचना ऐकणार ते मुख्यध्यापक कसले आणि मुख्याध्यापक पडवे यांनी खरोखरंच कोणतीही सूचना न ऐकता व उपाययोजना न करता आपल्या मर्जीने सर्व वर्ग सुरु ठेवले मात्र त्यांना पिण्यासाठी शाळेत शुद्ध पाणी नसल्याने विद्यार्थी तहानलेली असल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

एका पालकाने मुख्याध्यापक यांना सुचविले की वर्ग पाचवीमधे विद्यार्थी संख्या जास्त असल्याने व एकाच बेंचवर दोन विद्यार्थी असल्याने आपल्याकडे पहिली ते सातवी पर्यत शिक्षक आहे पण सर्व प्रायमरीचे चार वर्ग बंद असल्याने येथील एका शिक्षकाला पाचवीचे दोन वर्ग बनवून शिकवणी करण्याचे काम करा कारण शाळेचा एक महिना शिल्लक राहिला आणि दोन विद्यार्थ्यामधे सामाजिक अंतर ठेवून कोरोना चा धोका यामुळे टाळला जाऊ शकतो म्हणून सुचना केल्या पण मुख्यध्यापकांनी सुचनाचे पालन न करता काही मुलांना एक दिवसा आड येण्याचे सांगीतल्याने त्यामुळे विद्यार्थी मात्र ज्ञानार्जनापासुन मुकत आहे.
शिवाय या शाळेत मुलांना शुध्द पाणी पिण्याची सोय नाही, शाळेत विद्यार्थ्याना पंखा आहे तर विद्युत पुरवठा बंद पडलेला आहे , सुसज्ज शौचालय आहे ते सुद्धा घाणीने माखलेले, शाळेची रंगरंगोटी नाही,

या आधी २०१८/२०१९ मध्ये मुलांना शुध्दपिण्याच्या पाण्यासाठी ६४०००₹ चा आरो लावल्याची ग्रामंपचायतकडे नोंद आहे, मात्र तिथे लावले ते सुध्दा धुळखात पडले आहे याबाबत आमच्या प्रतिनिधी विचारणा केली असता मुख्यध्यापक पडवेसर यांनी उडवाउडवीचे उत्तरे देवून वेळकाढुपणा दाखविला. यामुळे येथील पालकांनी मुख्यध्यापकाप्रती संताप व्यक्त केला असून यात काही तरी गौदबंगाल असल्याचे पालक सांगतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याच्या द्रुष्टीने याकडे वरीष्ठानी लक्ष घालावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

नैसर्गिक वर्गाचे बांधकाम?

समुह साधनाची इमारत बांधकाम करते वेळी मुलांना निसर्गाच्या सानिध्यात ज्ञानार्जन व्हावे म्हणून नैसर्गिक वर्गाचे बांधकाम करण्यात आले होते पण ते झुडपात आहे आता त्याची कचराकुंडी बनविली गेली असून याकडे वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here