Home Breaking News ब्रेकिंग न्यूज :- रात्रीला पडोली येथे महाराष्ट्र फर्निचर च्या दुकानाला लागली आग.

ब्रेकिंग न्यूज :- रात्रीला पडोली येथे महाराष्ट्र फर्निचर च्या दुकानाला लागली आग.

 

लाखो रुपयांचे फर्निचर जळून खाक.वेळीच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचल्याने आगीवर नियंत्रण.

पडोली प्रतिनिधी :-

काल रात्री जवळपास ११.१५ सुमारास पडोली येथे महाराष्ट्र फर्निचर या दुकानाला आग लागून लाखो रुपयाचे फर्निचर जळून खाक झाल्याची माहिती हाती आली असून या आगीवर नियंत्रण करण्यासाठी अग्निशमनच्या दलाला पाचारण करण्यात आले होते त्यामुळे इतर दुकानाला व घराला या आगीची झळ पोहचली नाही अन्यथा ही आग आजूबाजूला असलेल्या दुकान व घरापर्यंत पोहचली असती तर मोठा अनर्थ घडला असता व कोट्यावधी रुपयाचे नुकसान व मोठी जीवित हानी झाली असती.

पडोली पोलीस पोलीस स्टेशन च्या हाकेच्या अंतरावर असलेल्या महाराष्ट्र फर्निचर या दुकानाला आग  लागताच पोलीसांनी या संदर्भात लगेच अग्निशमन दलाला पाचारण केल्याने या भीषण आगीवर नियंत्रण करता आले हे विशेष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here