Home राष्ट्रीय शैक्षणिक :- IIT प्रवेश परीक्षा जेईई अॅडव्हांस 2021 ला मिळाली स्थगिती

शैक्षणिक :- IIT प्रवेश परीक्षा जेईई अॅडव्हांस 2021 ला मिळाली स्थगिती

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण विभागाचा निर्णय.

दिल्ली न्यूज नेटवर्क :-

देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे IIT प्रवेश परीक्षा जेईई अॅडव्हांस स्थगित करण्यात आली आहे. ही परीक्षा आता कधी घेतली जाईल, याबाबतची अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. 3 जुलै रोजी जेईई अॅडव्हांस 2021 परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पण ही प्रवेश परीक्षा आता स्थगित करण्यात आली आहे. जेईई मेन परीक्षा यंदा कोरोनामुळे घेण्यात आलेली नाही.

केंद्रीय शिक्षण विभागाच्या नोटिसीमध्ये सांगितले आहे की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्याच्या महामारीच्या परिस्थितीला ध्यानात घेऊन JEE अॅडव्हांस 2021 परीक्षा जी 03 जुलै, 2021 (शनिवारी) घेतली जाणार होती, ती स्थगित करण्यात आली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखेची घोषणा योग्य वेळी करण्यात येईल.

खरं तर काही दिवसांपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरून देशभरात JEE Advanced 2021 परीक्षा 3 जुलै 2021 रोजी घेतली जाणार असल्याची माहिती दिली होती. यावर्षी विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश घेताना 75 टक्के ची पात्रता सुद्धा शिथिल करण्यात आल्याचे देखील पोखरियाल यांनी त्यावेळी सांगितले होते.

कोरोना च्या काळात यावर्षी अनेक विद्यार्थ्यांनी आयआयटी प्रवेशासाठी बारावी परीक्षेत 75 टक्केची पात्रता शिथिल करावी अशी मागणी केली होती. त्यामुळे JEE Advanced 2021 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक दिलासा मिळाला होता. पण ही परीक्षा आता स्थगित करण्यात आली आहे.

आता देशातील वाढत्या कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर JEE (Main) मेन 2021 सत्रातील परीक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. देशातील 23 आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE Advanced 2021 परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना JEE Mains 2021 परीक्षेला सामोरे जावे लागते. यावर्षी 4 सत्रामध्ये ही परीक्षा विद्यार्थ्यांना देण्यास सवलत दिली गेली होती. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल,मे 2021 या चार सत्रामध्ये जेईई मेन्स परीक्षा घेतल्या जाणार होत्या. मात्र या परीक्षांना यंदा स्थगित केले आहे.

आगोदरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या वाढत्या धोका लक्षात घेता NEET PG परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. NEET-PG किमान 4 महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आणि परीक्षा 31 ऑगस्ट 2021 पूर्वी घेण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous articleराजकीय कट्टा :- काँग्रेस महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत?
Next articleलक्षवेधी:- नव्या संसदेच्या उभारणीसाठी मोदी सरकार एवढं उतावीळ का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here